यवतमाळ/ नेर येथे माजी मंत्री संजय राठोड यांनी नि शुल्क आरोग्य शिबिराचे उपस्थितांना संबोधित करून उद्घाटन केले
जिल्हा प्रतिनिधी/ एस के शब्बीर
उद्घाटन आज नेर येथे माजी मंत्री आमदार संजय भाऊ राठोड यांनी ‘आजादी का अमृत महोत्सव निमित्य राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत’ आयोजित भव्य नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबीराचे उद्घाटन करून उपस्थितांना संबोधित केले.शिबीर परिसरात विविध आरोग्य विषयक माहिती देणारे स्टॉल्सला भेट देऊन पहाणी केली. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य हरीहर भाऊ लिंगणवार ,शिवसेना तालुका प्रमूख मनोज नाल्हे, शहर प्रमूख दीपक आडे, बाजार समितीचे सभापती भाऊराव ढवळे, तहसीलदार साहेब, बि. डि. ओ मॅडम,तालुका वैद्यकीय अधिकारी व इतर सर्व पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते.