हदगांव / वनविभागाचे कारभार चव्हाट्यावर, अवैध माती उपसा, वृक्षतोडांना रान मोकळे
हदगाव प्रतिनिधी :- शेख अतिक
हदगाव तालुक्यातील वन परिक्षेत्र अंतर्गत वन विभागाच्या जमिनीची वीट भट्टी वाहनधारकांचा वापर सातबारा एका ठिकाणचा उत्खनन मात्र दुसऱ्या ठिकाणी होताना दिसून येत आहे .वन विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी वन परिक्षेत्र अधिकारी वनपाल जिल्ह्यातून कारभार चालवतात तसेच ईथल्या वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे हिमायतनगर चा पण प्रभार असल्याकारणाने दोन्ही विभागांवर लक्ष देण्यास कानाडोळा होताना दिसून येत आहे. त्यामुळे मातीची मोठ्या प्रमाणात तस्करी होताना दिसून येते. तसेच तालुक्यातील आंबा,चिंच,पिंपळ वडाचे झाड मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असताना दिसून येते. संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्याचे आर्थिक संबंध आहे की काय? असे वृक्ष प्रेमींना वाटते. शासनाने कोट्यावधी वृक्ष लागवडीचे वनमंत्री यांनी निर्णय घेतला होता हे केवळ कागदोपत्री आहे की काय अशी परिस्थिती हदगाव तालुक्यातील तळणी, निवघा बाजार, शिरड, तामसा, लोहा पाटी, चोरंबा, धन्याची वाडी, हडसणी, डोंगरगाव तालुक्यातील वन विभागाचे फार मोठे जंगल जमीन असून वन विभागाच्या गलथान कारभारामुळे तालुक्यातील नागरिकांना यांच्या वर कारभारामुळे वायु प्रदूषणाचा मोठ्या प्रमाणात नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष दिले तर वृक्षतोडीवर तात्काळ विचार करून संबंधितावर तसेच बेजबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी जनतेतून जोर धरत आहे.