महागाव /नगरपंचायत मुख्याधिकारी यांना विविध मागणीचे वंचित आघाडीने दिले निवेदन
जिल्हा प्रतिनिधी/ एस.के. शब्बीर
महागांव शहरा मध्ये वंचित बहुजन आघाडी ने दिला नगरपंचायत ला इशारा अपंगाच्या कल्याणाकरीता शासनाच्या विविध योजना असून त्यांचे जिवनमान उंचावण्याकरीता आपल्या कार्यालयाकडे 5% निधी उपलब्ध असतांनाही तो खर्च केलेला नाही. महागांव शहरातील अपंग व्यक्ती या लाभापासून वंचित राहीले आहेत त्यामुळे अत्यंत गरजु अपंग लाभार्थ्यांना प्राधान्य त्वरित देवून निधी वाटप करण्यात यावा.
रमाई घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत लाभार्थ्यांना उर्वरीत हप्ते न मिळाल्यामुळे लाभाथ्र्यांचे डोक्यावर कर्जाचा डोंगर निर्माण होत आहे. त्यांनी बांधकामाकरीता हातउसणे घेतलेले पैसे परत करण्यास अडचण निर्माण होत असल्याने आपल्या कार्यालयामध्ये वारंवार चकरा मारुन सुध्दा घरकुलाचे हप्ते देण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे सदर घरकुल योजनेचे उर्वरीत हप्ते त्वरीत देण्यात यावे. व
अनु. जाती-जमाती मुलीची निवासी शाळेच्या शेजारील घनकचरा कार्यालयामार्फत टाकण्यात आलेला आहे त्यामुळे शाळे च्या परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण दिसून येत आहे. त्यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घनकचरा मुळे रोगाची साथ परसण्याची दाट शक्यता दिसून येत आहे. त्यामुळे सदर घनकचना त्वरीत उचलून त्याची विल्हेवाट लावण्यात यावी अन्यथा यामध्ये काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास जबाबदार नगरपंचायत राहील व शहरातील मोकाट जनावरे यांचेमुळे नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच मुख्य रस्त्यावर या मोकाट जनावरांमुळे अपघात होण्याची दाट शक्यता सुद्धा आहे. मोकाट जनावरे यांचेमुळे काही किरकोळ अपघात झाले असून कोणती आतापर्यंत जिवीत हाणी झाली नाही पण . यापुढे जिवीत हाणी होऊ नये म्हणून शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त नगरपंचायतीने करण्यात यावा. अशी मागणी वंचित बहुजन आघाडी महागांव तालुकाच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा इशारा वंचित बहुजन आघाडी चे शहराध्यक्ष पप्पु कावळे यांनी निवेदनात बोलताना सांगितले