ताज्या घडामोडी

भोकर सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत झालेल्या कामांमध्ये भ्रष्टाचार चा बोलबाला.

भोकर सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत झालेल्या कामांमध्ये भ्रष्टाचार चा बोलबाला.

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी( एमडी इलियास)

 

भोकर मतदार संघाचे भाग्यविधाता माननीय अशोकरावजी चव्हाण यांच्या मतदारसंघांमध्ये भ्रष्टाचार जोमात

 

भोकर शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून भोकर शहराच्या विकासासाठी म्हणून माननीय अशोकराव चव्हाण यांनी आपल्या मतदार संघामध्ये प्रयत्न करून करोडो रुपयांची निधी उपलब्ध करून दिली मात्र काही गुत्तेदार व भोकर सार्वजनिक बांधकाम विभागा मधील काही अधिकारी हे विकास कामांमध्ये भ्रष्टाचार करून माननीय अशोकराव चव्हाण यांच्या नावाची बदनामी करत आहे अशी चर्चा भोकर येथील नागरिक करत आहे सदरील भोकर शहरांमध्ये

वार्ड क्रमांक१ / २ सहिद नगर व मंजुळा नगर या भागामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत सीसी रोड काम चालू आहे मात्र अंदाज पत्रकाप्रमाणे न करता थातूरमातूर करण्यात येत आहे सदरील दैनिक न्याय टाइम्सचे जिल्हा प्रतिनिधी एमडी इलियास यांनी विचारणा केली असता गुत्तेदार यांनी ठेवलेले चिले चपटे बोलतात की हमचा गुत्तेदार हे एक नंबर काम करत आहे व 100% अंदाजपत्रक प्रमाणे काम होत आहे

सदरील महाराष्ट्र राज्यामध्ये हे पहिला गुत्तेदार आहे जेणेकरून 100% अंदाज पत्रक प्रमाणे काम करत आहे म्हणून महाराष्ट्र राज्याचे भाग्यविधाता माननीय अशोकरावजी चव्हाण यांनी या गुत्तेदारा चा सत्कार करून यांना उत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार देण्यात यावा अशी चर्चा वॉर्डातील नागरिक करत आहे सदरील भोकर शहरांमधील सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत होत असलेले कामाकडे माननीय अशोकरावजी चव्हाण यानी लवकरात लवकर लक्ष देऊन भ्रष्ट गुत्तेदार व सार्वजनिक बांधकाम अधिकारी यांच्यावर कारवाई करून यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी अपेक्षा भोकर येथील नागरिक करत आहे

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *