यवतमाळ/उमरखेड येथे महाविकास आघाडीतर्फे फटाक्याच्या अतिश बाजीने जयश्री ताई जाधव यांचा जल्लोष
जिल्हा प्रतिनिधी / एस के शब्बीर
जयश्री जाधव कोल्हापूर उत्तरमधील पहिल्या महिला आमदार संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे . काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा 18,901 मतांनी विजय झाला आहे . कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान सन्मान काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना मिळाला आहे . तर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये आमदारकीचं खातं उघडण्याचं भाजपचं स्वप्न अधुरं राहिलं . एकूण 26 फेऱ्यांमध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी पार पडली . जयश्री जाधव पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होत्या . मधल्या काही फेऱ्या वगळता त्यांनी आपली आघाडी कायम राखली . अखेर त्यांचा मोठा मताधिक्याने विजय झाला . म्हणून कोल्हापूर- उत्तर विधानसभा च्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने बाजी मारून श्रीमती जयश्रीताई जाधव यांचा दणदणीत विजय झाल्याबद्दल उमरखेड माहेश्वरी चौका मध्ये दि.१६/ मार्च शनिवार रोजी सायंकाळी ६ वाजता महा विकास आघाडीतर्फे फटाके फोडून त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा दिल्या उमरखेड महा विकास आघाडी मध्ये आनंदाचे स्वप्न