महागांव/ येथील दुर्दैवी घटना शिवाजी तुकाराम पारटकर विषपाचणे आत्महत्या.
जिल्हा प्रतिनिधी/ एस के शब्बीर यांची रिपोर्ट
महागाव शहरामध्ये वार्ड क्रमांक १५ मधून शिवाजी तुकाराम पारटकर वय ४२ वर्ष या इसमाने नवीन पोलीस वसाहत बांधकाम परिसरात विषपाचने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. तेथून जात असताना एका अज्ञात व्यक्तीकडून महागांव शहरातील वार्ड क्रमांक १५ मधील शिवाजी तुकाराम पारटकर ओळख पटवून दिली.यां घटनेची माहिती पारटकर परिवारामध्ये देण्यात आली मुरतकाच्या पत्नीने ही माहिती मिळताच महागांव पोलीस स्टेशन ला धाव घेतली असता शिवाजी तुकाराम पारटकर यांची मृत्यू झाल्याची माहिती महागांव पोलीस स्टेशनला देण्यात आली. शिवाजी तुकाराम पारटकर यांच्या जीव संपण्याचा कारण काय आहे.वृत्तपत्र लिहीपर्यंत पुढील तपासासाठी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पी आय विलास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली.शरद यडतकर व गजानन तरटे करीत होते. महागांव पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन शहानिशा करून डेडबॉडीला पुढील तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालय सवना येथे हलवण्यात आले होते.पारटकर परिवारामध्ये शॉक कोसळलेले आहे मृतक शिवाजी यांना २ मुले व पत्नी असा परिवार त्यांच्यामागे होता शिवाजी तुकाराम पारटकर यांना आई बाबा चा सहारा नसल्यामुळे सासरी आपल्या पत्नी व मुलासोबत वार्ड क्रमांक १५ मध्ये राहत होते या घटनेचा पुढील तपास महागांव पोलीस कर्मचारी करीत आहे