राजकारण

महागांव तहसील कार्यालय ची प्रगती शून्यावर कायमस्वरूपी तहसीलदार देण्यात यावा या करिता जिल्हाधिकारी यांना निवेदन

महागांव तहसील कार्यालय ची प्रगती शून्यावर कायमस्वरूपी तहसीलदार देण्यात यावा या करिता जिल्हाधिकारी यांना निवेदन

 

जिल्हा प्रतिनिधी/ एस के शब्बीर यांची रिपोर्ट

 

प्रभारी तहसीलदार विश्वंभर राणे साहेब. यांच्याकडे नायब तहसीलदार निवडणूका असलेला तहसीलदार पदाचा अतिरिक्त परचार काढून कायमस्वरूपी तहसीलदार महागाव तहसील कार्यालयात देण्यात यावा. विश्वंभर राणे यांचे कार्यकाळात झालेल्या कुळातील जमीनी महसुल आदिवासी प्रकरणात त्यांनी केलेल्या आदेशाची सखोल चौकशी करण्यात यावी . पर्यावरणाला हाणीकारक ठरलेल्या विटभट्याने परवाने महागाव शहराला घातलेला विळखा व बेकायदेशिर दिलेली परवानगी नियमानुसार नसल्याने त्यामुळे उपजावू शेतकऱ्यांची जमीनीमधील मातीची दिवसागणीत तस्करी होत आहे . यामध्ये व्यसनाधीन शेतकरी यास भट्टी मालकाला बळी पडत आहेत . त्यामुळे दिवसागणीत जमीनीची पोत कमी होत असल्याने शेतकऱ्याला यापुढे शेती न. पिकल्या ने आत्महत्यांची वाट काढावी लागेल .ग्राम समृध्दी शेती पांदन रस्ते योजना या योजनेमधून आजपर्यंत एकाही पांदन रस्त्याला मंजुरात देण्यात आलेली नसून केंद्र व राज्य शासनाची बदनामी या अधिकाऱ्यामुळे होत आहे . असा निष्क्रीर्य अधिकाऱ्याला तात्काळ हटवून कायमस्वरुपी तहसिलदार देण्यात यावा व

 

 

रोजगार हमी योजनेचे तहसिलदार हे कार्यक्रम अधिकारी आहेत . मात्र त्यांना रोजगार हमी योजना या कायद्याविषयी फारसे ज्ञान अवगत नसल्यामुळे या योजनेचे वैयक्तीक लाभ सोडून कोणतेही काम झालेले नसून याला जबाबदार कोण ? तालुक्यामध्ये शासकीय कामे कुठेही चालु असल्याचे दिसत नाही त्याला हे प्रभारी तहसिलदार हेच कारणीभूत ठरत आहेत . तसेच प्रशासकीय कामकाजामध्ये त्यांचा अनुभव कमी पडत असल्यामुळे अतिरिक्त कर्मचाऱ्यावर त्यांचा वचक राहीलेला नाही . त्यामुळे बळीराजा व जनतेची कामे रेंगाळली आहेत. उन्हाळा सुरु झाला असल्यामुळे तालुक्यामध्ये पाणी टंचाई खेड्यापाड्यांचा सुद्धा जाणवत असतांना यंत्रणेची बैठक घेतली नसून तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी ठोस पावले या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत उचललेली नाही . निराधार लोकांच्या पगारी देण्यास प्रचंड काळाचा विलंब त्यांचे कार्यकाळात झाला असून . नविन प्रस्ताव मंजूर करण्यास दिरंगाई करीत असल्याचे सुद्धा दिसून येत आहे . तालुक्यात अवैध धंद्यांना यांचा च आशिर्वाद असल्याने चौकशी केल्यास मोठे घबाड उघडकीस येईल . यामध्ये अवैध धंद्यावर कोणतीही मोठी कार्यवाही यांनी या अधिकाऱ्याकडून स्वतःहून केली नाही असे जनतेच्या लक्षात येत आहे . तसेच लाखो रुपयाच्या दंडाच्या वसूल्या प्रलंबीत आहेत . सदर प्रभारी तहसिलदार.राणे यांचे पद त्वरीत काढून कायम ( नियमित ) तहसिलदार देण्यात यावा . अन्यथा विदर्भ जन आंदोलन संघर्ष संघटन च्या वतीने दिनांक २२/०४/२०२२ ला रुमने आंदोलन मोर्चा काढण्यात येईल . तहसील कार्यालय निवेदन देताना जन आंदोलन संस्थापक. जगदीश भाऊ नरवाडे. अमृतराव देशमुख. माजी भाजपा तालुका अध्यक्ष विलास कव्‍हाणे. सुनील टेमकर. तात्या उर्फ गोविंदराव शिंदे. मधुकर दावजी टेकाळे. लक्ष्मीबाई बंडू पारवेकर. दिलीप सुरोशे. पंजाब राठोड. आदिनाथ चव्हाण. गजानन पवार पांडुरंग भडंगे. राजाराम पाटे तहसील कार्यालय महागाव येथे निवेदन दिले,,,,

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *