हिमायतनगर शहरातील वार्ड क्रं.13 मध्ये स्वखर्चातून भावी नगरसेवक फेरोज खुरेशी यांनीसुरू केला टॅंकरद्वारे पाणी पुरवठा…
हिमायतनगर /- एस के चांद यांची रिपोट
शहरातील पाणीटंचाई लक्षात घेता संपूर्ण वार्डात दरवर्षी तीव्र पाणी टंचाई भासते पण येथील नगर पंचायत प्रशासनाकडून ही टंचाई निवारणाच्यासाठी कुठल्याही प्रकारची उपाय योजन करण्यात येत नसल्याचे सध्या तरी दिसून येत आहे त्यामुळे शहरातील वार्ड क्रमांक 13 मधील सामाजिक कार्यकर्ते तथा काँग्रेस अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष फेरोज खुरेशी यांनी स्वखर्चातून येथील नागरिकांना टॅंकरद्वारे मोफत पाणी पुरवठा करण्यास सुरवात केली आहे
गेल्या पंधरा दिवसांपासून उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अनेक ठिकाणी वण वण फिरावे लागत असल्याचे त्यांना समजताच हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे कट्टर समर्थक तथा काँग्रेस अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष फेरोज खुरेशी यांनी त्यांच्या स्वखर्चातून येथील नागरिकांना टॅंकरद्वारे मोफत पाणी पुरवठा करण्यास सुरवात केली आहे ही सेवा येणाऱ्या काळात अविरत पने सुरू ठेवणार आहे व येथील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा पोहचू देणार नाही असे त्यांनी सांगितले मागील 15 वर्षा पासून ते काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यामुळे मागील काळात हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी वार्ड क्रं 13 मध्ये झालेल्या पोट निवडणुकीची सर्व जबाबदारी काँग्रेस अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष फेरोज खुरेशी यांच्या वर दिली होती ती त्याने नेटाने पार पाडत येथील पोटनिवडणुकीत उभे असलेल्या अजगरी बेगम अब्दुल रहेमान खुरेशी यांनी भरघोस मताने निवडून आणून त्यांनी किंगमेकर ची भूमिका बजावली त्यामुळे आमदार माधवराव पाटील यांचे ते कट्टर समर्थक समजले जातात त्यामुळे येणाऱ्या काळात पण वार्डाच्या विकासासाठी ते कट्टीबद्द असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे आगामी होणाऱ्या नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्यास ते निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले