उमरखेड येथे ६५ लाखांच्या कचरा घोटाळा प्रकरणात आरोपीच्या पिंजऱ्यात असलेल्या विद्यमान आमदारांसह गुन्हेगारावर अटी
जिल्हा प्रतिनिधी/ एस के शब्बीर
भाजपाचे आमदार नामदेवराव ससाने यांना जिल्हा सत्र येथील न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला होता . जिल्ह्याबाहेर जायचे असल्यास न्यायालयाची परवानगी आवश्यक होती . ही परवानगी न्यायालयाने नाकारल्यामुळे उमरखेडच्या आमदारांना विधीमंडळ अधिवेशनाला मुकावे लागले . याच प्रकरणात दोन कंत्राटदारांचा जामीन अर्ज पुसद न्यायालयाने फेटाळला आहे . पुसद येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने येथील भाजपाचे आमदार नामदेव ससाणे यांना कचरा घोटाळ्यात सशर्त अंतरिम जामीन मंजूर केला होता . आ . ससाणे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी मुंबईला जाण्याकरिता परवानगी न्यायालयाला मागितली . परंतु न्यायालयाने ही परवानगी नाकारली होती . त्यामुळे उमरखेडच्या या आमदारांना अधिवेशनस्थळी जाता आले नाही . आ . ससाणे या घोटाळ्याच्या वेळी उमरखेड नगर परिषदेचे अध्यक्ष असल्यामुळे गोत्यात आलेले आहेत . दरम्यान , घोटाळ्यातील आरोपी कंत्राटदार फिरोजखान आझादखान आणि गजानन मोहोळे यांनी जामीनासाठी न्यायालयात अर्ज सादर केला होता , न्यायालयाने या दोघांचाहे अर्ज फेटाळला आहे . त्यामुळे नपचे मुख्याधिकारी व लेखापाल आणि हे दोन कंत्राटदार यांच्यावर कुठल्याही क्षणी अटकेची कारवाई होऊ शकते . यापूर्वी तत्कालीन आरोग्य निरीक्षक विशाल श्रीवास्तव याला अटक झाली आहे .