क्रीडांगण

महादीप परीक्षेतून ३६ विद्यार्थ्यांची विमानवारी निश्चित घाटंजी तालुक्याची झेप :

महादीप परीक्षेतून ३६ विद्यार्थ्यांची विमानवारी निश्चित घाटंजी तालुक्याची झेप :

 

जिल्हा प्रतिनिधी/ एस के शब्बीर यांची रिपोर्ट

 

यवतमाळ जिल्ह्यांमधून एकूण ३६ विद्यार्थी विद्यार्थिनी ची विमान वारी लवकरच सन्मान सोहळा,ची तयारी नंतर दिल्ली दर्शन करिता या ३६ विद्यार्थी विद्यार्थिनी मारली झेप

यवतमाळ : संकटाला संधी मानून संघर्ष करणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने घेतलेल्या महादीप परीक्षेत बाजी मारत ३६ विद्यार्थ्यांनी दिल्ली भेटीसाठी विमानाचे तिकीट निश्चित करून घेतले.

खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना बाल वयातच स्पर्धा परीक्षांची सवय लागावी यासाठी शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून वर्षभर महादीप उपक्रम राबविण्यात आला. त्यानंतर मंगळवारी जिल्हास्तरीय परीक्षा घेण्यात आली. त्यात ३६ विद्यार्थी पात्र ठरले. त्यापैकी सर्वाधिक विद्यार्थी एकाच घाटंजी पंचायत समितीमधील ११ विद्यार्थी चा समावेश आहे. विशेष म्हणजे येथील तिवसाळा जिल्हा परिषद शाळेचे तब्बल सात विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले. येथील श्रवण अडकिने व मनीष मुनेश्वर या दोघांनी ५० पैकी ४९ गुण मिळवून जिल्ह्यातून पहिला क्रमांक पटकावला आहे.

जिल्ह्यातील चार लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांमधून केंद्र, तालुका आणि जिल्हा पातळीवरील परीक्षेत गुणवत्ता सिद्ध करून ३६ विद्यार्थी पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा जिल्हा परिषदेत आयोजित होणार आहे. तसेच या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल. सेस फंडातून विजेत्यांना सायकल देण्याचेही नियोजन केले आहे. तसेच येत्या काळात या विद्यार्थ्यांना विमानाने दिल्लीवारी घडविली जाणार आहे.

बॉक्स

हे विद्यार्थी झाले उत्तीर्ण

तिवसाळा (घाटंजी) येथील श्रवण अडकिने, मनीष मुनेश्वर, पलक शेलुकार, यशवंती राठोड, सोहम खंडाळकर, शिवम राठोड, वलिका चौहान, सायतखर्डा येथील नमन लेनगुरे, साक्षी पेटकुले, झटाळा येथील तन्वी ढवळे, जरंग येथील नेहा लेनगुरे, वालतूर (पुसद) येथील निखिल जाधव, वसंतपूर येथील दीपा चव्हाण, सुमित चव्हाण, बजरंगनगर येथील वैभव आडे, शारी (आर्णी) येथील नयना आडे, उमरी पठार येथील लकी पारधी, कोसारा (मारेगाव) येथील तनुष्का बाभळे, पिंपरी (राळेगाव) येथील संस्कार सांभारे, पिंपळापूर येथील वेदांत सातकर, विडूळ (उमरखेड) येथील राशी कुंटे, बोरी येथील अक्षरा माने, ढाणकी येथील शेख मावान शेख इरफान, सोनम परवीन शेख मुश्तफा, कात्री (कळंब) येथील निशांत दुबे, वैष्णवी वाल्दे, ओंकार बनसोड, करळगाव (बाभूळगाव) येथील तेजस हिवरकर, गणोरी येथील अंजली मोकासे, वडगाव रोड (यवतमाळ) अश्विनी राऊत, शेजल भुरे, तायडेनगर येथील अलशिरा शेख फरीद, नायगाव (दारव्हा) येथील राशी जाधव, पाळोदी येथील वैष्णवी येवले, करजगाव येथील टीना राठोड, लाडखेड येथील अरसलान खान अजमत खान. यांचा एकूण यवतमाळ जिल्ह्यात ३६ विद्यार्थी विद्यार्थ्यांनी झेप घेतली आहे

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *