क्राईम डायरी

उमरखेड महागाव विधान सभेचे,आमदार नामदेवराव ससाने,यांना अटक पुर्वक जामीन मंजूर 

उमरखेड महागाव विधान सभेचे,आमदार नामदेवराव ससाने,यांना अटक पुर्वक जामीन मंजूर

 

जिल्हा प्रतिनिधी एस के शब्बीर पुसद

 

नगर परिषद उमरखेड येथे 65 लाखाच्या कचरा घोटाळ्या, प्रकरणी भाजपचे आमदार नामदेव ससाने यांनी अटकपूर्व जामीन साठी अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय,पुसद येथे धाव घेऊन सदर प्रकरणात चित्रपट दामिनी, चित्रपटातील रोल प्रमाणे तारीख पे तारीख, झालेल्या आमदार ससाने सह 11 जना, विरुद्ध, गुन्हे दाखल झाले होते या गुन्हेगारावर तारखांवर तारखा, मिळत असून आज दिनांक14 मार्च सोमवार रोजी, जिल्हा व सत्र न्यायालय, पुसद येथे न्यायमूर्ती, ( व्ही, बी, कुलकर्णी ) यांनी अटक पूर्व जामीनला मंजुरात आमदार नामदेवराव ससाने यांना मिळाली असून, उमरखेड महागाव भाजपा कार्यकर्ते व आमदार नामदेवराव ससाने यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण,

स्वच्छ सर्वेक्षण,2018 अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन, व विल्हेवाट, प्रकरणी सदर गुन्हे दाखल झाले होते उमरखेड नगर परिषद च्या कचरा संकलन, घोटाळ्यात नगर अध्यक्ष, तथा आमदार नामदेव ससाने सह 11 जना विरुद्ध, गुन्हे दाखल झाले होते न्याय पालिकेने, पोलिसावर ताशोरे, ओढले होते त्यातच उमरखेड पोलिसांनी तात्काळ आरोपी आरोग्य निरीक्षक, विशाल श्रीवास्तव, यांना त्यांच्या घरासमोरून अटक केली होती व आरोपी,विशाल श्रीवास्तव, यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी, ठोठावण्यात, आली होती व त्यावर,जिल्हा व सत्र, न्यायालय पुसद येथे आमदार, नामदेवराव ससाने, वैयक्तिक अर्जावर सुनावणी घेत असल्याने अटकपूर्व जामीन अर्ज आज दिनांक 14 मार्च रोजी मंजूर केला व इतर चार आरोपीची सुनावणी दिनांक 15 मार्चला सुनावणी आदेश दिले आहे, सदर न्यायालीन प्रक्रियेकडे, तालुक्यात व जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांचे व नागरिकांचे चार आरोपीच्या सुनावणी साठी लक्ष लागले आहे

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *