मानव- वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी सायकलद्वारे साक्षरता अभियान यवतमाळचे, कपिल शाम कुवर, यांचा महागाव येथे सत्कार
प्रतिनिधी /एस.के शब्बीर यवतमाळ
अभियानाचे जनक कपिल शामकुवर यांचा जंगी सत्कार कार्यक्रम महागाव येथे कार्यकर्त्यांनी त्यांचे कौतुक करून फुल गुच्छ हार देऊन त्यांचा सत्कार,
जंगलाची वृक्षतोड वाढल्याने जंगली प्राण्यांनी गावात प्रवेश करणे सुरू केले आहे.त्यामुळे मानव आणि वन्यजीव प्राण्यात संघर्ष वाढल्याचे अनेक उदाहरणे आहेत.कारणास्तव
प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.त्यास कारणीभूत मानव आहे.
आठवड्यातील एक दिवस मानवी – वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी मोहीम हाती घेतली पाहिजे.
असे प्रतिपादन जनआंदोलन संघर्ष आधार समितीचे अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी केले आहे.मानव – वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी जिल्ह्यात सायकलद्वारे यवतमाळचे कपिल शामकुवर यांनी साक्षरता अभियान हाती घेतले आहे.दहा तालुक्यातील प्रवास करून ते महागाव येथे आले असता आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.या प्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी हेमंत उबाळे,नायब तहसीलदार डॉ. संतोष अडमुलवाड , ठाणेदार विलास चव्हाण,माजी सभापती डी बी नाईक शिवसेना माजी जिल्हा प्रमुख सुदाम खंदारे नगर सेवक विशाल पांडे सुरेश शर्मा सुधीर नरवाडे रुपेश देशमुख असलंम सुरया अशोक पदमवार गजानन सूरोशे प्रसाद शिंदे सुरेश नरवाडे गजानन गावंडे साहेबराव ढोले सत्कार कार्यक्रमात उपस्थित होते.कपिल शामकुवर बोलताना म्हणाले की, जनतेने एक दिवस प्राण्याच्या बचावासाठी एक दिवस सायकलने जनजागृती करावे.माणसाप्रमाणे प्रण्याण्याही जीवन आहे.अभियानातून प्राणी बचाव , व वन्यप्राण्यांची हत्या थांबविण्यासाठी संदेश द्यावा.त्यांच्या या अहवालाला उपस्थितांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
यावेळी.कपिल शामकुवर यांचा सत्कार घेण्यात आला.त्यांच्या उमरखेड येथील पुढील प्रवासातही शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच त्यांना महागाव तालुक्यातील सीमेवर मान्यवरांनी सन्मानाने कपिल शाम कुवर यांना साथ देत त्यांना मार्गक्रमण सुद्धा करण्यात आले.