राजकारण

खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाने मंजुर वायफना व पळसपूर रस्त्याचा शुभारंभ

खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाने मंजुर वायफना व पळसपूर रस्त्याचा शुभारंभ

 

१६ कोटी ७५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर

 

हिमायतनगर नागोराव शिंदे

 

खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हदगाव तालुक्यातील वायपना व हिमायतनगर तालुक्यातील पळसपूर पळसपुर डोल्हारी रस्त्याच्या 16 कोटी 75 लाख रुपये खर्चाच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ (दि.13 रविवार)रोजी होणार आहे .या कामाचे उदघाटन माजी केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री सूर्यकांताताई पाटील यांच्या हस्ते होणार आहे. असुन सकाळी 11 वाजता वायपना येथे दुपारी 3 वाजता पळसपूर येथे उदघाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या रस्त्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळणाचा मार्ग सुकर होणार आहे.

 

या कार्यक्रमाला खासदार हेमंत पाटील यांच्यासह माजी आ.नागेश पाटील आष्टीकर, आ.माधवराव पाटील जवळगावकर, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, उपजिल्हाप्रमुख रमेश घंटलवार, तालुकाप्रमुख शामराव चव्हाण, रामभाऊ ठाकरे, शहरप्रमुख राहुल भोळे, प्रकाश रामदिनवार, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड , पळसपुर, डोल्हारी, सिरपल्ली, सेलोडा पंचक्रोशीतील सरपंच, पोलिस पाटिल, प्रतिष्ठीत नागरीकांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

 

खासदार हेमंत पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव -हिमायतनगर तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्गाच्या कामांना मंजुरी मिळाली असून पुढील काळात उर्वरीत तालुक्यातील कामांना निधी मंजूर करून दिला जाणार आहे.

 

हदगाव तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या 12 पासून सुरू होणाऱ्या वायपना- घोगरी- चिखली- दिग्रस या 13 कि. मी रस्त्याच्या कामासाठी एकूण 8 कोटी 73 लक्ष मंजूर झाले आहेत. हिमायतनगर तालुक्यातील राज्यमार्ग 259 पासून सुरू होणाऱ्या एकंबा – सिल्लोडा – शिरपल्ली – डोलारी – पळसपुर – हिमायतनगर पार्डी दरम्यान 12 कि. मी.लांबीच्या रस्ता कामासाठी एकूण 8 कोटी 2 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, विदर्भातून तेलंगणा राज्यात जाण्यासाठी हा रस्ता प्रमुख मार्ग या असल्यामुळे दोन्ही तालुक्यातील प्रमुख आणि आजूबाजूच्या परिसरातील गावे थेट तालुक्यांना जोडली जाणार आहेत. यामुळे ग्रामीण भागातील दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागला असून मागील अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता. परंतु खासदार हेमंत पाटील यांनी विशेष लक्ष देऊन या रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळवून दिली आहे. याबाबत दोन्ही तालुक्यातील या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त करून खासदार हेमंत पाटील यांचे आभार मानले आहेत.

 

उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याच आवाहन तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे यांचेसह शिवसैना पदाधिकारी यांनी केल आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *