महागांव तालुक्यातील श्री, दत्त पेट्रोल पंपावर, ५० हजार रुपयाची डकेटी,
प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव
नागपूर :तुळजापूर ३६१ महामार्गावर खडका येथे श्री दत्त पेट्रोलियम पंपावर भर दिवसा दरोडेखोरांनी बंदूक ताणून पैशाने भरलेली रोकड बॅग इसकाटून पळ गाठण्यात दरोडेखोरांना यश, आज दिनांक,१ मार्च २०२२ रोजी,दुपारच्या वेळी ३:३० ते,४ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली असून मिळालेल्या माहितीनुसार
पेट्रोल पंपावर तीन बंदूक धारी युवक आले त्यांनी पेट्रोल दुचाकी मधे भरण्याच्या डावात आपला डाव पटकावला, पेट्रोल पंपावर नोवरला बंदुकीचा धाक दाखवून, रोकड असलेली बॅग हीसकाटुन दरोडेखोर पसार झाले, सदर बॅगमध्ये,५० हजार रुपयांची रक्कम असून सांगण्यात येत आहे या घटनेची माहिती फोन द्वारे महागाव पोलिस स्टेशनला मिळताच नाकाबंदी सुरू करण्यात आली, दरोड्याची संख्या तीन असून महागाव च्या दिशेने दरोडेखोरी पसार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे पोलिसांनी नाकाबंदी केली असून अद्याप दरोड्याचा शोध लागला नाही पुढील तपास सुरू आहे