क्रीडांगण

महागांव तालुक्यातील / अंबोडा येथील श्री संत गजानन महाराज यांची यात्रा प्रकटदिना निम्मित कुस्तीचे दंगल मोठ्या उत्साहात साजरा.

महागांव तालुक्यातील / अंबोडा येथील श्री संत गजानन महाराज यांची यात्रा प्रकटदिन कुस्तीचे दंगल मोठ्या उत्साहात साजरा.

 

प्रतिनिधी / एस.के.शब्बीर महागाव

 

महागाव तालुक्यातील सटवाई अंबोडा येथे दरवर्षी श्री गजानन महाराज यांची यात्रा भरत असते मात्र गेल्या दोन वर्षापासून कोविड-१९ मुळे रद्द करण्यात आले होते. मात्र यावर्षी सेनी टायझर सोशल डिस्टन्स ठेवून सुरुवात केली होती.ओमायक्रोनच्या वाढत्या रुग्ण संख्येचे संकटं आले असल्यामुळे प्रशासनाकडून राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. त्या नियमांचे पालन करुन यावर्षी यात्रा भरन्यात आली होती. यात्रेत दरवर्षी कुस्त्यांच्या दगंली, लेझीम स्पर्धा, खेळ, क्रिकेट, यासह विविध कार्यक्रमांनी हा यात्रा उत्सव मोठ्या उत्सवाच्या वातावरणात साजरा करण्यात येतो. श्री गजानन महाराज मंदिरावर दर्शनासाठी भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होते.

 

परंतु यावर्षी देखील यात्रेवर ओमायक्रोन व कोरोना महामारीचे संकटं असल्यामुळे राज्यात प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत. त्यामुळे क्या निर्बंधाचे पालन करून भाविक भक्तांनी दर्शन घेतले आज दिनांक २१ जानेवारी कुस्त्यांचा कार्यक्रम ठेवण्यात आले होते. कुस्त्यांची दंगल ई चे उद्घाटन सोहळा महागाव पोलिस स्टेशनचे एपीआय भोसले साहेब दीपक राऊत पाटील यांनी बजरंग बली व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे नारळ फोडून व कुस्ती दंगल आखाड्याचे पूजन करून यांच्या शुभहस्ते सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक रुपेश पतंगे आणि दीपक राऊत पाटील आणि एपीआय भोसले साहेब यांचे स्वागत शाल-श्रीफळ देऊन त्यांचे कुस्ती दंगल सोहळा निमित्त सत्कार करण्यात आला.या कुस्ती दंगल चे कार्यक्रम आयोजक मित्र मंडळ यांनी वेळेवर उभारला या कुस्ती दंगल साठी बाहेरगावाहून आलेले पैलवान, जसे हरियाणा, जोधपूर,हिंगोली, पुसद, शेंबाळपिंपरी, माळकिनी,बुलढाणा, चे पैलवान यांनी श्री संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त कुस्ती दंगल मध्ये पैलवान यांनी भाग घेतला होता.

 

भव्य कुस्त्यांची दंगल अंबोडा (स. ) ता, महागांव, श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिन उत्सवानिमित्त अंबोडा यात्रेमध्ये, आज दिनांक २१ फेब्रुवारी २०२२, रोजी भव्य कुस्त्यांची दंगलीचे उद्घाटन सोहळा महागाव पोलिस स्टेशनचे, A, P, I, भोसले साहेब, दीपक राऊत पाटील यांनी बजरंग बली व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची नारळ फोडून व कुस्ती दंगल आखाड्याचे पूजन करून , यांच्या शुभ हस्ते पार पडला,

 

 

या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक रुपेश पतंगे, यांनी दीपक राऊत पाटील, आणि एपीआय भोसले साहेब यांचे स्वागत शाल श्रीफळ नारळ देऊन त्यांचा कुस्ती दंगल सोहळा निमित्त सत्कार करण्यात आला,

 

 

अंबोडा यात्रेमध्ये कुस्त्या च्या दंगलीमध्ये पहिले पारितोषिक २१००१, डॉ, पंजाबराव राठोड, ( लेवे कर,) दुसरे बक्षीस, १५००१,) तिसरे बक्षीस, ११००१, रितेश भाऊ पुरोहीत, चौथे बक्षीस, ९००१, संदीप भाऊ ठाकरे, पाचवे बक्षीस, ८००१, विशाल भाऊ पांडे, आणि, सहावे बक्षीस, विजय सुरेशराव गोरे, सवना, यांनी संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिन उत्सवा निमित्ते, यात्रेमध्ये सहभाग घेतला होता,

या कुस्ती दंगल चे पहिले बक्षीस २१००१ हजाराचे हकदार ज्ञानेश्वर मंगरूळपीर येथील रहिवासी यांचे बक्षीस देताना पंजाबराव राठोड लवेकर यांनी दिली. यावेळी सुनील पतंगराव, सदानंद हेडे, शेख रियाज, रामेश्वर कदम, राज मोहन ठाकरे, शेख बशीर शेख मेहबूब, ज्ञानेश्वर कार्लेवाड, गजानन कदम, आकाश व्हगडे, आकाश बेलखेडे, शेख अहमद,, अतुल पतंगे आणि कुस्त्यांची कॉमेट्री करण्यासाठी विनोद हिरामण नरवाडे, रोहिदास पाटे, अली खा पठाण, यांनी कुस्तीचे मार्गदर्शन केले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *