महागांव, येथे, संत नरहरी सोनार यांची,७३६ वी पुण्यतिथी नवनिर्वाचित नगरसेवकांच्या हस्ते साजरी केली
प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव,
आज सोनार समाजाचे संत शिरोमणी नरहरि महाराज यांच्या ७३६ वी पुण्यतिथी निमित्याने आणि छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त , सोनार व्यापारी संघटना महागाव यांनी”नुकताच पार पाडलेल्या नगर पंचायतचे नवनिर्वाचित नगरसेवक याचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. ह्या प्रसंगी नरहरी चौकाच्या फलकाचे अनावरण करून संत नरहरि महाराज यांच्या प्रतिमेस हारार्पण करून पुण्यतिथी साजरी केली
नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ.करूनाताई शिरबिरे आणि उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी पुष्प हार घालून केले. सत्कार सोहळ्याच्या. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सौ करुणा ताई. शीरबीडे , प्रमुखं पाहुणे म्हणून जेष्ठ नेते नवनिर्वाचीत नगरसेवक,श्री, रामराव पाटिल. आणि माजी उपनगराध्यक्ष तथा नवनिर्वाचीत नगरसेवक, शैलेश कोपरकर,आणि नवनिर्वाचीत नगर उपाध्यक्ष सुरेश पाटील,उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून झाली. सोनार संघटनेचे महागाव चे अध्यक्ष,श्री,संजय चिंतामणी यांनी प्रस्तावना केली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संत नरहरी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. आणि सर्व संतमंडळींनाआणिथोरपुरुषाला, जाती धर्मात न विभागता त्यांची शिकवण सर्वमानवजाती साठी उपयुक्त असते हे पक्के लक्षात ठेवा असे त्यांनी मार्गदर्शनात सगितले. ह्या प्रसंगी जेष्ठ नेते, रामराव पाटील आणि सुरेश पाटील ह्यांनी, मार्गदर्शन केलें. संचलन संजय,नरवाडे, यांनी,केले ह्या प्रसंगी. नगरअध्यक्षा करुणा ताई शिरबिडे , नगरसेविका सौ. जयश्री ताई नरवाडे. सौ. आशा ताई बावणे, सौ. डाखोरे ताई इत्यादी महीला नगर सेवका चा सत्कार विभूती संजय चिंतामणी ह्यांनी शाल व पुष्प गुच्छ देऊन करण्यात आला तसेच, नवनियुक्त नगरसेवक शाखा भरवाडे, विशाल पांडे, गजानन साबळे, परवेज सुरय्या, महेश पाटील. शैलेश कोपरकर, रामराव पाटील, सुरेशपाटील, दीपक पाटील, इत्यादीचा शाल व पुष्गुच्छ देऊन सत्कार सोनार बांधवां कडून केल्या गेला. सोबतच भाजपा शहर अध्यक्ष नीलेश पाटील आणिशिवसेना शहर अध्यक्ष तथा माजी सभापती राजु राठोड याचाही स्त
करण्यात आले ह्या प्रसंगी. संजय नरवाडे आणि रविराज कावळे ह्या जेष्ठ पत्रकार बंधूंचा ही सत्कार करण्यात आला.
शेवटी आभार प्रदर्शन संघटनेचे सचिव राजेश माळवे यानी केले ह्या प्रसंगी उपाध्यक्ष दिगंबर माळोदे, गणेश नाशिककर, अमोल राजूरकर, अमोल रत्नपारखी, कैलास रोडे, विशाल डहाळे, पंकज रूनवाल , नामदेव यादव, नत्थु दारर्व्हेकर, सुधीर मोटारवार, राजु दारर्व्हेकर, प्रमोद रोडे, दिगंबर भोकरे, दिगंबर थोरकर, संजू वाढोंनकर, स्वराज कदम, नितीन पानपट्टे. संजय अमिलकंठवार, भांगे वकील, माजी उपनगराध्यक्ष उदय नरवाडे, इत्यादी सोनार बांधव आणि सन्मानीत पाहुणे उपस्थित होते.