क्राईम डायरी

हिमायतनगर बसस्थानक वर भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या युवकावर भर दिवसा चाकूने हल्ला..

हिमायतनगर बसस्थानक वर भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या युवकावर भर दिवसा चाकूने हल्ला..आरोपीस अटक.शहरात भितीचे वातावर

 

नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे

 

हिमायतनगर  शहरातील बस स्टँड परिसरात भर दिवसा दोन युवकांची मोटार सायकलला टक्कर लागण्या वरून भांडण झाली ती सोडविण्यासाठी गेलेल्या नव तरुण युवकावरआरोपींनी चाक्कुने वार करून गंभीर जखमी केले आहे त्यामुळे शहरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

 

या बाबत सविस्तर वृत्त असे की शहरातील बस स्टँड परिसरात भरदिवसा दोन युवकांमध्ये मोटार सायकल गाडीच्या वादावरून भांडण झाले ते भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या प्रशांत देवकत्ते या नवतरुण युवकास चाकूने वार करून गंभीर जखमी केले त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे ,बाळू भुरके, व विकास नरवाडे यांनी प्रशांत ला अवघ्या एका तासात नांदेड येथील भगवती हॉस्पिटल येथे पोहचऊन त्यांच्या वर उपचार केला त्यामुळे त्यांचे प्राण वाचले या घटनेमुळे शहरांमध्ये चाकू भोसकून खुनाचा प्रयत्न झाल्याच्या घटनेवरून शहरातील सुजाण नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अशा घटनांना आवर घालण्यासाठी शहरात लवकरात लवकर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे अशा भावना नागरिकांतून व्यक्त होत आहेत या घटनेत गंभीर जखमी झालेल्या प्रशांत उर्फ भाऊ आनंदराव देवकते यांच्यावर नांदेड येथील भगवती रुग्णालयात उपचार सुरू आहे या घटने संदर्भात हिमायतनगर पोलिसांनी सबंधित आरोपीस ताब्यात घेऊन हिमायतनगर पोलिस स्टेशन डायरीत या घटनेची नोंद केली व घटनेचा पुढील तपास हिमायतनगर चे पोलीस निरीक्षक भगवान कांबळे हे करत आहेत

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *