भारतीय मराठा महासंघाचे कंधार तालुका अध्यक्ष विठ्ठल पाटील ताटे यांची नि.पा.सावरगाव सेवा सहकारी सोसायटी चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली
प्रतिनिधी / नांदेड
सेवा सहकारी सोसायटी सावरगाव नी. ता. कंधार ची निवड प्रक्रिया आज दिनांक 16/ 2 /2022/रोजी सर्व अधिकारी व गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत आज पर्यंत गावात केलेल्या कामाची दखल घेऊन गाव वाल्यांनी त्यांच्यावर खूप मोठा विश्वास टाकला आणि त्यांना बिनविरोध काढण्याची प्रक्रिया पार पाडली सेवा सहकारी सोसायटी च्या चेअरमन पदी विठ्ठल पाटील ताटे नि.सावरगाव नगरीचे जेष्ठ नेते भारतीय मराठा महासंघाचे कंधार तालुका अध्यक्ष विठ्लराव पाटील ताटे सावरगाव कर व व्हाईस चेअरमन पदी प्रतिष्ठित नागरिक शंकर लक्ष्मण उप्पे यांची सर्व गावकऱ्यांच्या वतीने बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीबद्दल आपल्या गावातील सर्व मतदारांचे खूप खूप आभार व्यक्त केले विठ्ठल पाटील ताटे पुढे म्हणाले की आणि सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून ज्या काही शेतकऱ्यांच्या अडचणी असतील ते सोडविण्याचे प्रयत्न अहोरात्र करील आणि सर्व गोरगरीब समाजाला न्याय देण्याचे काम करेल असे त्यांनी व्यक्त केले त्यांची निवड
झाल्याबद्दल भारतीय मराठा महासंघाचे नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील पवार होटाळकर यांनी पुढील कार्याला हार्दिक शुभेच्छा दिल्या.