महागांव: नगराध्यक्ष पदासाठी भाजपा- शिवसेनेची गाठ नगराध्यक्ष शिवसेनेच्या करुणा शिरबीडे , उपाध्यक्ष भाजपा सुरेश पाटील नरवाडे यांची निवड
प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव
महागांव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसने १७ जागा पैकी ,७ जागा जिंकल्या त्यामध्ये अपक्षांची, १ सीट भर टाकून एकूण,८ सीटावर काँग्रेसने शिखर गाठले होते आणि त्याच बरोबर शिवसेना,५ तर भाजपा ला ,४ जागा विजयी मिळाल्या होत्या काँग्रेसला सत्ता मध्ये सत्ता मिळवण्यासाठी,१ का नगरसेवकाची नितांत अध्यक्षपदासाठी गरज होती काँग्रेस,८ आणि शिवसेना,५ असे महाविकास आघाडीत सत्तेचे गणित मांडल्या जात होते नगराध्यक्ष पदासाठी, काँग्रेसकडून सुरेखा विनोद सुरोशे, सुनंदा दिलीप कोपरकर, जयश्री संजय नरवाडे, असे तीन नामांकन दाखल होते तर शिवसेना पक्षाकडून,करुणा नारायण शीरबीडे, व, भाजपा कडून रंजना दीपक आडे , यांनी आपला अर्ज दाखल केला होता महाविकास आघाडी करून सत्तेचे गणित जळविण्यासाठी, काँग्रेसकडून शर्तीचे प्रयत्न केल्या गेले,
शिवसेना कडून काही अटी ठेवण्यात असल्याने, सुनंदा दिलीप सुरोशे, यांना आपले नामांकन अखेरच्या दिवशी मागे घ्यावा लागला, कारण भाजपा, आणि सेनेच्या सत्तेच्या सोयारिकीत, भाजपाच्या, नगरसेवकांनी फेविकॉल सारखी पक्कड धरून मध्यस्थी, केलरत ने, काँग्रेसचे प्रयत्न निष्फळ, ठरले, शिवसेनेने भाजपाशी संघटन करून फाटलेल्या जाळ्यामध्ये काँग्रेसच्या,२ बंडखोर नगरसेवकांनी साथ देऊन , राखुंड्यावर आजची खिचडी शिजवली,