ताज्या घडामोडी

हळद प्रक्रिया उद्योग मार्गदर्शन ( तरुण )शेतकऱ्यांना उद्योजक बनविण्यासाठी श्री जगदीश भाऊ नरवाडे यांचा पुढाकार

हळद प्रक्रिया उद्योग मार्गदर्शन ( तरुण )शेतकऱ्यांना उद्योजक बनविण्यासाठी श्री जगदीश भाऊ नरवाडे यांचा पुढाकार

 

प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव

 

पारंपरिक शेतीच्या मागे न लागता शेतीला उद्योग बनवुन विविध पिकांवर प्रक्रिया करून उद्योग उभारून आर्थिक जीवनमान उंचविण्यासाठी तरुण

शेतकरी उद्योजक झाला पाहिजे या हेतूने महागाव उमरखेड पुसद तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर शिबीर चे आयोजन जनआंदोलन आधार संघर्ष समिती अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे तज्ज्ञ समिती सदस्य जगदीश भाऊ नरवाडे यांनी केले होते त्यास प्रचंड शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला

नवीन उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांना एखादा नवीन उद्योग उभा करण्यासाठी अनंत अडचणी चा सामना करावा लागतो.यामध्ये प्रामुख्याने आवश्यक कागदपत्रे तयार करताना कर्मचारी कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करतात अनेक वेळा फिरवतात

बँके कर्ज देण्यास टाळाटाळ करते त्यामुळे नवीन उद्योजक हा निराश होऊन जागीच राहतो म्हणून नवीन उद्योजक तयार होत नाही त्यामुळेच दिवसें दिवस बेरोजगारी वाढत आहे म्हणून हा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ठरल्या प्रमाणे कर्ज मंजुरी पासून उद्योग उभा राहेपर्यंत पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन जगदीश भाऊ नरवाडे तज्ञ संचालक ) यांनी दिले.

 

यावेळी हळद प्रक्रिया उद्योग मार्गदर्शन करताना सचिन मालकर यांनी पूर्ण उद्योग उभारणी साठी लागणारे कागदपत्रे शेतकऱ्यांच्या घरून नेण्याची तयारी दाखवून हळदी पासून होणारे बाय प्रोडक्ट बदल माहिती दिली

कर्क्युमिन कॅन्सर साठी जागतिक मागणी असल्याने महत्त्वाचा घटक असून त्याची बाजार भाव किंमत,लाखोच्या घरात आहे हळद तेल,

हळद पेष्ट ,हळद पावडर ,हळद आचार, बाय प्रोडक्ट तयार करून विदेशात पाठवण्यासाठी वेळोवेळी माहिती देऊन अडचणी सोडवू असे मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी,तालुक्यातील नवीन तीन उद्योजक गजानन रामराव वानखेडे उटी, गजानन वामनराव नजरधने महागाव, सचिन भोपासिंग राठोड राऊतवाडी यांना

पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रगतीशील शेतकरी तात्या शिंदे, गोविंदराव देशमुख, वीरेंद्र संजय पाटील पुसद, कैलास कदम उमरखेड, मोरेश्वर सुंदर शिंगाडे पिंपळगाव, सुरेश खंदारे ,विनोद संदीप जाधव, रंगराव देशमुख, योगेश पाचपुते ,प्रताप वानखेडे, किरण शिंदे, कृषी अधिकारी के. एस .वाघमारे सह शेतकरी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे

संचालन गोविंदराव देशमुख यांनी तर प्रास्ताविक जगदीश भाऊ नरवाडे यांनी केले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *