उमरखेड नगरपरिषद मध्ये ६५, लाख, कचरा घोटाळा उघडकीस आमदार ससाने सह अकरा जणांविरुद्ध गुन्हे दाखल
प्रतिनिधी एसके शब्बीर उमरखेड
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत २०१८ मध्ये घन कचरा संकलन व विल्हेवाटीच्या कामात नगरपरिषदे चा उमरखेड नगर परिषद मध्ये ६५, लाख रुपयाचा घोटाळा उघडकीस आल्याने उमरखेड येथे आमदार नामदेवराव ससाने सह११ जना विरुद्ध विविध गुन्हे दाखल करण्यात आले,६ फेब्रुवारी रोजी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करून नामदेव ससाने सह ११ जना विरुद्ध उमरखेड पोलिस स्टेशनचे अधीक्षक अमोल माळवे, यांनी दस्तएवजा ची पडताळणी करून आज दिनांक,७फेब्रुवारी रोजी विविध कलमानुसार जसे ,४२०,४०९,४६५,४६७,४६८,४७१,३४, भा : द : वि नुसार गुन्हा दाखल केला आहे
स्वच्छ भारत अभियान सर्वेक्षण,२०१८ अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन व विल्हेवाट यामध्ये नगरपरिषद कामांमध्ये करण्यात आलेल्या कामांमध्ये नगरपरिषद अधिनियम,५८, (२) आनव्ये कार्य त्तर, परवानगी घेऊन लाखो ची बिले काढण्याचा प्रकरणी तक्रार करण्यात आली होती सदर तक्रारीवरुन उपविभागीय अधिकारी स्वप्निल कापडणीस, घोटाळा प्रकरणाचा शहानिशा करून जिल्हा अधिकारी यांना अनियमितता झाल्याचा अहवाल सादर केला नगर विकास मंत्रालय ने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले,६५, लाख रुपयाच्या घोटाळ्यांमध्ये मुख्य अधिकारी गणेश चव्हाण, कंत्राटदार गजानन मोहळे, कंत्राटदार फिरोज खान आजाद खान, मजूर पुरवठादार पल्लवी इंटरप्राईजेस, आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक चंद्रशेखर जैस्वाल, पाणीपुरवठा सभापती दिलीप सुरते, आरोग्य सभापती अमोल तिवरंग कर, महिला व बालकल्याण सभापती सविता पाचकोरे, यांच्यासह लेखपाल सुभाष भुते, आरोग्य निरीक्षक विशाल श्रीवास्तव, असे एकूण अकरा जणांविरुद्ध, घन कचऱरा घोटाळ्यात प्रत्यक्ष सहभाग आढळल्याने नगर विकास मंत्रालय आदेशात या तक्रारीवरून जिल्हा अधिकारी अमोल येडगे, यांनी शुक्रवारी नगर परिषद अध्यक्ष व मुख्य अधिकारी यांच्यावर संभाजी सबंधितावर पोलिसात तक्रार देण्याची जबाबदारी दिली होती त्या तक्रारीनुसार उमरखेड नगर परिषद येथे ६५, लाख रुपयाचा घोटाळा उघडकीस आल्याने आमदार नामदेव ससाने सह,११ चला विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले