करंजी जवळ दुचाकी अपघातात एक जन जागीच ठार, तर दोघे गंभीर जखमी. विठ्ठल यलकेवाड यांचा मृतात समावेश
हिमायतनगर :-विकास गाडेकर
तालुक्यातील मौजे करंजी जवळ दि. ३० रात्री ११ वाजता एका कार्यक्रमावरून परत येत असताना नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. या गंभीर आपघातात मौ. आंदेगाव येथील विठ्ठल नारायण यलकेवाड वय ३५ वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला आहे. व तसेच त्यांच्या सोबत असलेले दोन जन गंभीर जखमी आहेत.जखमींवर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या बाबत अधिक माहीती अशी की, मौजे आंदेगाव ता. हिमायतनगर जि. नांदेड येथील विठ्ठल नारायण यलकेवाड व त्यांच्या सोबत इतर दोघे जन एका कार्यक्रमावरून नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गा वरून हिमायतनगर कडे परत येत असताना दि. ३० जानेवारी च्या रात्री ११ वाजता करंजी बस स्टँड जवळ अज्ञात वाहनने कट मारल्याने दुचाकी घसरून अपघात झाला.
या गंभीर अपघातात विठ्ठल नारायण यलकेवाड वय ३५ वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला. इतर दोन जन गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान सायंकाळी ० ४ वाजताच्या दरम्यान शवविच्छेदनानंतर मौ. अंदेगाव येथे मयत विठ्ठल वर अंत्यसंस्कार करण्यात येणार .