ताज्या घडामोडी

डोंगरगाव येथे ग्राम स्वच्छता अभियानातून वृक्षरोपण , शिक्षण, वेसन मुक्ती, शेतकरी आत्मचिंतन इत्यादी विषयावर मार्गदर्शन 

डोंगरगाव येथे ग्राम स्वच्छता अभियानातून वृक्षरोपण , शिक्षण, वेसन मुक्ती, शेतकरी आत्मचिंतन इत्यादी विषयावर मार्गदर्शन

यवतमाळ प्रतिनिधी

यवतमाळ सज्ञान दृष्टी. महागाव तालुक्यातील डोंगरगाव येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हरी भक्त पारायण साईनाथ महाराज वसमतकर यांच्या संदेशयातून डोंगरगाव येथे ग्राम स्वच्छता अभियान राबवून या अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण गाव स्वच्छ करून गावात जागोजागी वृक्षारोपण करून गावातील पुरुष महिला व नागरिकांनी सहभाग घेऊन सर्वांनी हातात झाडू घेऊन संपूर्ण गाव स्वच्छ करून या अभियानाच्या माध्यमातून साईनाथ महाराज वसमतकर यांनी डोंगरगावातील नागरिकांना ग्राम स्वच्छतेची , शिक्षण, वृक्षारोपण ,महिला सक्षमीकरण , शेतकरी आत्मचिंतन अशा विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले आहे

डोंगरगाव येथील नागरिकांच्या सहभागातून या ग्राम स्वच्छता अभियानाची सुरुवात डोंगरगाव येथील देवकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळा येथून सुरुवात करून साईनाथ महाराज वसमतकर यांनी सर्वप्रथम राष्ट्रगीत घेऊन ग्रामस्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांनी झाडू हातात घेऊन देवकर वाडी येथील शाळा , जिल्हा परिषद मराठी शाळा, इत्यादी ठिकाणी वृक्ष लागवड करून गावातील संपूर्ण रस्ते झाडून संपूर्ण गाव स्वच्छ करण्यात आले आहे साईनाथ महाराज वसमतकर यांनी नागरिकांना मोलाचा संदेश देऊन गावातील नागरिकांनी दर पंधरा दिवसाला गावात ग्राम स्वच्छता अभियान राबवून आपले गाव स्वच्छ ठेवण्याचे आव्हान करण्यात आले आहे या अभियानामध्ये गावातील पुरुष महिला व ग्रामपंचायत सदस्य दिगंबरराव देशमुख, सदाशिव हाडसे , ग्रामपंचायत कर्मचारी , आशा सेविका अंगणवाडी सेविका , गावातील नागरिकांनी सहभागी होऊन संपूर्ण गाव स्वच्छ करण्यात आले आहे विशेष म्हणजे आपले गाव आपला विकास करणे आरोग्याच्या दृष्टिकोनातून गावात ग्रामस्वच्छता अभियान राबविणे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच गावातील राजकीय गावपुढारी यांनी पुढाकार घेणे गरजेचे असताना सरपंच , उपसरपंच यांनी या ग्राम स्वच्छता अभियानात अनुपस्थित राहून ग्राम स्वच्छतेची एलर्जी असल्याचे यावेळी दिसून आले आहे

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *