फुलसावंगी ते किनवट डांबरी रस्त्याचे निकृष्ट बांधकाम सा.बा.विभागाची मुक संमत
प्रतिनिधी / प्रविण जिल्हावार फुलसावंगी
फुलसावंगी ते किनवट रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सध्या युध्द पातळी वर सुरू आहे. या होऊ घातलेल्या रस्त्यावर ज्या ठेकेदारा कडुन डांबरीकरणाचे काम सुरू आहे.त्या ठेकेदाराने शासनाने घालुन दिलेल्या अंदाज पत्रकात असलेल्या सर्व नियमांना खुंटीला टांगुन या रस्त्याचे दर्जाहीन काम करण्याचा खपका लावला आहे. या पुर्वी असलेल्या डांबरी रस्त्याचे जुने अवशेष बाजुला करुन पुन्हा नव्याने रस्ता करणे बंधनकारक असताना ही या ठेकेदारा कडुन जुन्या रस्त्यावर च बांधकामांचे मटरेल टाकुन बनवने सुरु आहे.तसेच रस्त्याच्या साईड पट्या ह्या या रस्त्याच्या बाजुलाच चर मारुन निघनारी काळी माती वापरली जात आहे. जे की तिथे दर्जेदार मुरुम वारणे अपेक्षित आहे. अश्या प्रकारे दर्जाहीन होणाऱ्या कामावर बांधकाम विभागाच्या अभियंत्याचे नियंत्रण असायला पाहिजे परंतु या कामाला जणु काही बांधकाम विभागानेच या दर्जाहीन कामालाच मुक संमती दिली की काय असा प्रश्न जनतेला पडला आहे.