सोशल मीडियावर पत्रकाराच्या बातमीला अपमान जनक टिपणी करणाऱ्या रविकांत कदम यांचा माफीनामा
नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे
91 इंडिया न्यूज/ स्टार 1 मराठी न्यूज .चे प्रतिनिधी जांबुवंत मिराशे यांनी हिमायतनगर येथील नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेत होत असलेल्या गर्दी बाबत बातमी प्रकाशित करून समाज माध्यमावर पाठवली. असता सोशल मीडियावरील व्हाट्सअप या समाज माध्यमावर हदगाव तालुक्यातील बोरगाव हस्तरा येथील रविकांत बालाजी कदम यांनी सदरील बातमी वर अपमानजनक टीका टिपणी केली होती याबाबत आमचे प्रतिनिधीनी यांनी हिमायतनगर पोलीस स्टेशन येथे रीतसर तक्रार देऊन चौकशी करण्याची मागणी केली असता आज दिनांक 22. 1. रोजी सबंधित माथेफिरू रविकांत बालाजी कदम या व्यक्तीस पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता माझ्याकडून चूक झाली असून याची मी जाहीर माफी मागतो व यापुढे लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत व इतर कुणाच्याही बाबतीत टीकाटिपणी करणार नाही असे पोलिस स्टेशन हिमायतनगर येथे लिहून दिले आहे