राजकारण

जीवनाच्या समृद्धीसाठी आणि स्पर्धा परीक्षेसाठी भूगोल विषयाचा अभ्यास आवश्यक.

जीवनाच्या समृद्धीसाठी आणि स्पर्धा परीक्षेसाठी भूगोल विषयाचा अभ्यास आवश्यक.

– माजी मंत्री डी.पी.सांवत

अर्धापूर :- खतीब अब्दुल सोहेल

 

श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर भूगोल विभागाच्यावतीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि मराठवाडा असोसिएशन ऑफ जॉग्राफर्स, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ पातळीवर प्रश्नमंजुषा स्पर्धा ‘आझादी का अमृत महोत्सव’ निमित्त घेण्यात आली. या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी माजी राज्यमंत्री डी.पी.सांवत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की भूगोल हा जीवनोपयोगी विषय आहे. त्याचा अभ्यास केल्याशिवाय जीवनामध्ये आपण अपेक्षित यश मिळू शकत नाही. आपला व आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर सर्वांनी भौगोलिक ज्ञान संपादन केले पाहिजे. स्पर्धा परीक्षेसाठी भूगोल हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे.असे प्रतिपादन केले. स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे यावेळी त्यांनी घोषित केली. श्रद्धेय शंकररावजी चव्हाण साहेबांचे जीवन व कार्य प्रश्नमंजुषा, शंकररावजी चव्हाण यांचे जलसिंचन कार्य, इत्यादी च्या माध्यमातून नवीन पिढीला साहेबांचे कार्य कळेल. भूगोल विभागाने आयोजित केलेल्या विविध उपक्रमाचे त्यांनी भरभरून कौतुक केलं. भूगोल विभागाने हा उपक्रम हाती घेतल्याबद्दल विभागाचे अभिनंदन केले. अशा विविध स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयाने नेहमीच करावे संस्था यासाठी सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन दिले.

यावेळी प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंदारकर भूगोल भूषण पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. वर्ष २०२१-२२ चा कु. कुरेशी अमरीन यांना हा पुरस्कार मिळाला . सावंत साहेबांच्या हस्ते रु. १००० आणि प्रमाणपत्र व प्रा. डॉ. हनुमंत भोपाळे लिखित यशाचा राजमार्ग ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी कोषाध्यक्ष माजी प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंदारकर, नरेंद्र चव्हाण, प्रसिद्ध उद्योजक बालाजी जाधव प्राचार्य डॉ. के के पाटील प्रा. मधुकर बोरसे , डॉ. गरड आणा ,प्रा. डॉक्टर आर. बी. कोटलवार हे उपस्थित होते. तर प्राचार्य डॉ. हरिदास राठोड, प्राचार्य डॉ. माधव गव्हाने, प्राचार्य डॉ धोंडगे प्रा. डॉ. सुरेश फुले, अध्यक्ष मॅग, प्राचार्य डॉ. नरेंद्र माळी,सचिव मॅग, प्रा. डॉ. एम.पी. मानकरी अध्यक्ष बीओएस व्हर्च्युअल माध्यमाद्वारे हे उपस्थित होते . या स्पर्धेसाठी विविध महाविद्यालयातील जवळपास ३३३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. प्राचार्य डॉ. हरिदास राठोड यांनी आपल्या मनोगतामध्ये भूगोल विभागाने प्रथमच अशा स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल अभिनंदन केले. ही स्पर्धा शंभर टक्के यशस्वी केली. शंकरराव चव्हाण साहेबांच्या नावाने चालत असलेले हे महाविद्यालय साजेल असेच कार्य या महाविद्यालयात होत आहे असे प्रतिपादन केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये सिंहाचा वाटा असलेले डॉ. गरड आण्णा यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के.के. पाटील यांनी केले. महाविद्यालयाचे विविध उपक्रम व वाटचाल यावेळी सांगितली. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचलन प्रा. डॉ.आर. बी. कोटलवार व प्रा. डॉ. परमेश्वर पौळ यांनी केले तर आभार प्रा. डॉ. बालाजी अव्हाड यांनी मानले.

हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम ऑफलाइन आणि ऑनलाइन माध्यमातून पार पडला. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रा. डॉ. हनुमंत भोपाळे, प्रा. डॉ. साईनाथ शेटोड, प्रा. डॉ. विलास चव्हाण, प्रा. डॉ. पठाण जे .सी., पत्रकार प्रा. डॉ. काजी, प्रा. डॉ. कुंटूरवार विक्रम आणि विद्यार्थी उपस्थित होते. तर व्हर्च्युअल माध्यमातून विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक आणि स्पर्धेत सहभागी झालेले दोनशे विद्यार्थी उपस्थित होते.

मा.प्राचार्य डॉ. बी.जी. वेळापूरकर, मा .प्राचार्य डॉ. के.बी.कनकुरे, प्रा. डॉ. एन. बी. रेड्डी, मा.प्राचार्य डॉ.एस.बी.जाधव, मा.प्राचार्य डॉ. निर्मला कोरे, मा. प्राचार्य डॉ. बालाजी सोनवणे, डॉ. सदानंद गोणे, . डॉ. संजीव कोळपे, प्रा डॉ.संजयादेवी पवार या सर्वांचे या स्पर्धेसाठी सहकार्य लाभले आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *