हिमायतनगर येथील शाम एजन्सीकडून शेतकऱ्यांची फसवणूक चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी.
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी /
तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे शासकीय योजननेतून अनेक योजनांचा लाभ मिळतो त्या योजनेचे साहित्य शहरातील बड्या व्यापाऱ्यांच्या दुकानातून घेण्याचे सबंधित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते पण गोरगरीब शेतकरी ते साहित्य घेण्यासाठी जातो तेव्हा त्यांच्या मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे असच एक प्रकार श्याम एजन्सीकडून फोनोलेक्स कंपनीचे स्पिंकलर संच विकत घेतांना घडला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची होणारी फसवणूक तात्काळ थांबून श्याम एजन्सी सारख्या दुकांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी कैलास रामकिशन बोड्डेवार यांनी हिमायतनगर येथील पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांच्याकडे केली आहे