महागाव येथे शिक्षण परिषद संपन्न
फुलसावंगी प्रतिनिधी प्रवीण जिल्हावार
आज दिनांक ४ जानेवारी ०२२ ला जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा महागाव येथे उर्दू शिक्षकांची तालुका स्तरीय शिक्षण परिषद संपन्न झाली.कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठण करून करण्यात आले आणि नातेपाक हानिफ कुरेशी यांनी पठण केले.यानंतर शिक्षणावर चर्चा करून शिक्षणाचे महत्त्व पटवुन देण्यात आले महादीप उपकरणावर प्रकाश टाकण्यात आले विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी नवनवीन उपाय सुचविण्यात आले.आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आणि काही तरी वेगळे करण्यासाठी प्रत्येकासाठी शिक्षण हे एक महत्वपूर्ण साधन आहे. शिक्षण आपल्या जीवनाच्या कठीण परिस्थितीत सामना करण्यास मदत करते.आयुष्यात चांगल्या संधी मिळविण्यासाठी संधीसाठी व विविध दरवाजे उघडतात ज्यामुळे कैरीअर चा विकास होतो शिक्षण आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक आवश्यक आहे.उच्च स्तरीय शिक्षण लोकांना सामाजिक आणि कौटुंबिक आदर ठेवण्यास आणि एक वेगळी ओळख निर्माण करण्यास मदत करते शिक्षणाचा काळ हा सर्वांसाठी खूप महत्वाचे असतो यामुळेच आपल्या जीवनात शिक्षणाचे इतके महत्व आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी गट शिक्षण अधीकारी किशोर रावते होते यावेळी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून बगाडे साहेब शिक्षण अधिकारी, बबनराव कोरके गट समन्वयक,धावंडकर साहेब अध्यक्ष मराठी शिक्षक संघटना, तालुक्यातील सर्व केंद्र प्रमुख बी आर सी चे कर्मचारी वृंद, महागाव पंचायत समितीचे शिक्षण विभाग,व तालुक्यातील उर्दू शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. प्रस्ताविक मो जुबेर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन आयुब नजर यांनी केले तर कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक शाह नाईम,मिर्झा सोहेल, शेख अहेमद,इम्रान खान,जावेद खान,असिफ खान,मोहसीन खान,यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दाऊद खान महा,राज्य, उर्दू शिक्षक संघटनेचे महागाव तालुका अध्यक्ष यांनी आभार मानले कार्यक्रमच्या शेवटी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.