खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने जुनुना ,पांगरा शिंदे , कंजारा,येथे मिळाला रेल्वेला थांब
नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे
नांदेड : हिंगोली लोकसभा मतदार संघातील औंढा तालुक्यातील कंजारा,वसमत तालुक्यातील जुनुना ,पांगरा शिंदे, पिंपळा चौरे या रेल्वे स्थानकावर खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने रेल्वे गाडयांना थांबा मिळाल्यामुळे परिसरातील गावकऱ्यांनी आनंद साजरा केला. याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी दक्षिण मध्य रेल्वे सिंकदराबाद चे महाप्रबंधक गजानन माल्या यांना व नांदेड दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय प्रबंधक यांच्याकडे पत्रव्यवहार करून मागणी केली होती, त्यानुसार चार रेल्वे गाडयांना थांबा देण्यात आला आहे .
कोरोनाच्या काळात बंद झालेल्या रेल्वे थांब्यामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील वसमत तालुक्यातील प्रवाशांची गैरसोय होत होती, याबाबत गावकऱ्यांनी खासदार हेमंत पाटील यांच्याकडे तक्रार केली होती, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने याबाबत दक्षिण मध्य रेल्वे सिंकदराबाद चे महाप्रबंधक गजानन माल्या यांना व नांदेड दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय प्रबंधक यांना पत्रव्यवहार केला त्यावर तातडीने कारवाई करून औंढा तालुक्यातील कंजारा व वसमत तालुक्यातील जुनुना ,पांगरा शिंदे , पिंपळा चौरे या ठिकाणी पॅसेंजर रेल्वे गाडयांना थांबा दिला आहे .
थांबा दिलेल्या रेल्वे स्थानकाच्या संपर्कात असलेल्या अनेक गावांना याचा फायदा होणार आहे . खासदार हेमंत पाटील यांनी केलेल्या पत्रव्यहारात वरील स्थानकावर थांबा दिल्यास आसपासच्या ४० च्या वर गावांना लाभ होणार असल्याचे नमूद केले होते . वरिष्ठ स्तरावरून या पत्राची दखल घेऊन थांबा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले होते .
नवीन वर्षात १ जानेवारीपासून थांबे पूर्ववत करण्यात आले आहेत, यामध्ये अकोला ते पूर्णा गाडी क्रमांक ०७८५५ व पूर्णा ते अकोला गाडी क्रमांक ०७७७३ आणि गाडी क्रमांक ०७७७४ अकोला परळी व परळी ते अकोला गाडी क्रमांक ०७६०० या रेल्वे गाडयांना कंजारा , पांगरा शिंदे, पिंपळा चौरे आणि जुनुना या स्थानकावर नियोजित वेळेवर थांबणार आहे.
रेल्वे स्थानकावर गाडयांना दिलेल्या थांब्यामुळे परिसरातील नागरिकांनी खासदार हेमंत पाटील यांचे आभार व्यक्त करून आनंद साजरा केला.