ताज्या घडामोडी

ब्रेकिंग न्यूज / ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जागीच ठार ; महागाव येथील घटना.

ब्रेकिंग न्यूज / ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जागीच ठार ; महागाव येथील घटना.

 

विशेष प्रतिनिधी / एस.के. शब्बीर महागांव

 

हॉटेलवर जेवण करून गावाकडे परतणाऱ्या दुचाकी स्वारास ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दोघे जागीच ठार झाले आहे .ही दुर्दैवी घटना उमरखेड रोडवर असलेल्या मातोश्री शाळेजवळ आज ता.३० रात्री साडेदहाच्या सुमारास घडली आहे.ओम संजय सोळंके (२५) रा. पोहंडुळ,शंतनु माटाळकर (२३) रा. करंजखेड ता.महागाव असे मृतकाचे नाव आहेत.

 

मिळालेल्या प्राप्त माहिती नुसार ,

मृतक हे नातेसंबंधाने मामेभाऊ आहे.ते आपल्या दुचाकी क्र. एम.एच २९ क्यू ४३७२ ने उमरखेड रोडवर असलेल्या हॉटेलवर जेवण करून गावाकडे परत येत होते.दरम्यान पाठीमागून नांदेड वरून यवतमाळ कडे जाणाऱ्या ट्रक क्र.एम.एच २६ बी.ई ५१९७ ने दुचाकीला जोरदार धडक दिली.त्यात दुचाकीवरील दोघेही जागीच गतप्राण झाले.

 

अपघाता दरम्यान दुचाकी ही ट्रकच्या मागी अडकल्याने दुचाकी ट्रकसोबत जवळपास एक किमी पर्यंत फरकट गेली.ट्रकला अडकलेल्या दुचाकीवरून नागरिकांनी ट्रकचा पाठलाग करून महागांव जुनेबसस्थानकावर ट्रकचालकाला पकडले.या अपघातात १मृतकाचा मेंदू डोक्या बाहेर पड़ला होता. तर दुसऱ्या मृतकाचे आंग शरीरापासून वेगळे झाले,असे तेथिल प्रथमदर्शी नागरिकांनी अमच्या प्रतिनिधिशी बोलतांनी सांगितले.या घटनेची माहिती महागाव पोलिस स्टेशनला कळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पोलिसांनी आपला फौजफाटा तैनात केला असून ट्रक चालकाला महागांव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.अपघाता नंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी म्हणून जागोजागी पोलीस तैनात केले होते.वृत्तलीहेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *