आरोग्य

हिमायतनगरमध्ये पहिले २ आणखी १ ओमीक्रॉन चा बांधित रुग्ण आढळला. काळजीने लसीकरण घ्या.

हिमायतनगरमध्ये पहिले २ आणखी १ ओमीक्रॉन चा बांधित रुग्ण आढळला. काळजीने लसीकरण घ्या.

 

एस. के. चांद यांची रिपोट हिमायतनगर

 

शहरात मागील काही दिवसांपूर्वी दोन ओमयक्रोन रुग्ण आढळून आल्याने नांदेड जिल्ह्यात एकच खळबळ माजली होती आता त्या पाठोपाठ आज दिनांक 30 डिसेंबर रोजी अजून एक महिला ओमीक्रोन पॉझिटिव्ह आल्याने हिमायतनगर तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली होती त्यामुळे दक्षिण आफ्रिकेमधून आलेल्या या कोरोना विषाणूच्या व्हेरियंटने आता नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील प्रवेश केल्यामुळे खुप भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अजुन ह्या रुग्णांच्या संपर्कात किती जण आले हे सांगता येत नाही ? कारण असे सागल्या जात आहे की ह्या रुग्णांचे नातेवाईक डॉ.असल्याने त्यांचा संपर्क थेट जनतेशी असतो महणुंन सध्या शहरात खुप मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ह्याची नांदेड जिल्हाधिकारी व हिमायतनगर येथील आरोग्य विभागाने काळजी घेऊन शहरात लसीकरण मोहीम वाढवली आहे ह्या घटने नंतर आता हिमायतनगर प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.

दक्षिण आफ्रिकेवरून आलेल्या एका डॉ.च्या कुटुंबातील ह्या तिन्ही महिला असल्याचे सांगण्यात येत आहे व ह्या ओमिक्रॉनची लागण झालेल्या महिलांनी बाहेर देशातच कोविड प्रतिबंधक लस घेतलेली आहे. दि.20 डिसेंबर 2021 रोजी प्रवासात त्यांना सौम्य ताप आला होता. त्यानंतर अन्य कोणतीही लक्षणं त्यांना आढळून आली नाहीत. त्यामुळे या रुग्णाचा आजार एकूण सौम्य स्वरुपाचा असून ते सध्या नांदेड येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहे. या रुग्णाच्या अति जोखमीच्या निकट सहवासितांचा आणि कमी जोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात आला असून इतर सर्वजन कोविड निगेटिव्ह आढळले आले आहेत. याशिवाय या महिलांनी ज्या विमानाने प्रवास केला त्या विमान प्रवासातील सहप्रवाशांची देखील तपासणी करण्यात येत आहे त्याचबरोबर अजून हिमायतनगर शहरातील निकट सहवासितांचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती हिमायतनगर येथील वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. डी. डी. गायकवाड यांनी दिली आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *