राजकारण

खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने शेतकऱ्याला ४० हजाराची आर्थिक मदत 

खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने शेतकऱ्याला ४० हजाराची आर्थिक मदत

 

नांदेड – हिमायतनगर नागोराव शिंदे

 

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव (तु) येथील शेतकऱ्याची म्हैस पुराच्या पाण्यात वाहून जाऊन मरण पावल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मदत मिळण्यास विलंब होत असताना खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने शेतकऱ्याला ४० हजाराचा धनादेश देऊन मदत मिळवून देण्यात आली.

पुराच्या पाण्यात वाहून जाऊन मरण पावलेल्या पशुधनांची नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येते, जिल्ह्यात यंदाच्या हंगामात अतिवृष्टी झाल्यामुळे वीज आणि वादळी वाऱ्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होऊन अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पुराच्या पाण्यात वाहून जाऊन पशुधन हानी झाल्यास राज्य शासनाच्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आर्थिक मदत देण्यात येते. कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव (तु) येथील शेतकरी देविदास नानाराव कवाने यांची म्हैस पुराच्या पाण्यात वाहून मरण पावली होती,

याबाबत त्यांनी कळमनुरी तहसील कार्यालयात अर्ज दाखल करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली होती.तक्रार दाखल होऊनही कोणीच दखल घेत नसल्याने शेतकरी कवाने यांनी खासदार हेमंत पाटील यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडले यावर खासदार हेमंत पाटील यांनी तातडीने कारवाई करत कळमनुरी तहसील नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभाग, तहसीलदार यांना संपर्क करून सातत्याने पाठपुरावा केला.त्यांनतर प्रकरण मार्गी लागले सर्व कागदपत्रांची पूर्तता आणि पंचनामा झाल्यानंतर अखेर खासदार हेमंत पाटील यांच्यामुळे शेतकऱ्याला न्याय मिळाला, आणि ४० हजाराचा धनादेश थेट शेतकऱ्याला मिळवून देण्यात आला. अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल असताना शासनाच्या मदतीशिवाय पर्याय उरला नसून ,त्यातही शासन मदत मिळण्यास विलंब होत होता. कळमनुरीच्या तहसिलदार सुरेखा नांदे, लिपिक राजकुमार लांडगे , सरपंच माधव काळे , संतोष काळे, यांच्या उपस्थित धनादेश वितरित करण्यात आला.खासदार हेमंत पाटील यांचे कळमनुरी -औंढा विधानसभा क्षेत्राचे जनसंपर्क अधिकारी अमोल बुद्रुक यांनी याकामी सहकार्य केले. खासदार हेमंत पाटील यांच्यामुळेच मला नुकसान भरपाई मिळू शकली याबाबत शेतकरी कवाने यांनी आभार मानून ऋण व्यक्त केले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *