ताज्या घडामोडी

tv9maza स्पेशल लाईव्ह.पुसद तालुक्यात वन विभाग खंडाळा बिट मधील वडगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात युवती जागीच ठार..

पुसद तालुक्यात वन विभाग खंडाळा बिट मधील वडगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात युवती जागीच ठार..

 

प्रतिनिधी / एस. के शब्बीर यवतमाळ

 

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यामधील खंडाळा बिट वडगाव शिवारातील वन विभाग क्षेत्रफळ मोठे असून वडगाव शिवारातील मंदिराशेजारी एका बिबट्यांनी

प्रातविधीसाठी गेलेल्या कु. शितल नागोराव शिंदे. वय ( 23 वर्षीय युतीवर बिबट्यांने मान्यवर हल्ला करून कु. शितल नागोराव शिंदे या मुलीचा मृत्यू खंडाळा बीड मधील वडगाव शिवारातील बिबट्याने मंदिरापाशी त्या मुलीवर घेऊन मानेवर हल्ला करून तिला जागीच ठार केले ही घटना सकाळी 6:30 ते 7 वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून वडगाव पूर्ण शेत शिवारात जागली वर असलेले काहीजणांनी आरडाओरड केल्या मुळे बिबट्यांनी तेथून पळ घाटून जंगलात फरार झाला या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी तात्काळ वन विभागाला व खंडाळा पोलिस स्टेशनला दिली असता

 

वडगाव बीट चे वनरक्षक आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन परिस्तीची पाहणी केली या घटनेने आता या बिबट्याच्या भीतीमुळे शेत शिवारात जगली वर असणाऱ्या वा गावामध्ये सर्व नागरिकांना भितीचे वातावरण पसरले आहे वडगाव नागरिकांचे मत आहे की त्या बिबट्याचा बंदोबस्त करून सापळा लावून पकडण्याची मागणी वडगाव बीट वन विभागाला केली जात आहे

व मृत कु. शितल नागोराव शिंदे या तरुणीच्या वारसांना तत्काळ आर्थिक सहाय्य मदत द्यावे अशी सुद्धा मागणी गावातील नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *