क्राईम डायरी

हिमायतनगरात येणारा गुटका उमरखेड शहरात वाहनासह ६० लाखाचा गुटखा जप्त

हिमायतनगरात येणारा गुटका उमरखेड शहरात वाहनासह ६० लाखाचा गुटखा जप्त

 

पोलीस प्रशासनाची धाडसी कार्यवाही

 

नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे

 

उमरखेड > दि. २७

राज्यामध्ये गुटखा बंदी असतांना राजरोशपणे गुटखा विक्री सुरूच आहे जळगांव ( खानदेश ) येथून उमरखेड मार्गे हिमायतनगर जाणारे गुटख्याचे वाहन विडूळ जवळ उमरखेड पोलीसांनी शनिवार दिनांक २७ रोजी रात्री ९.३० दरम्यान पकडले असून त्यामध्ये सुगंधीत तंबाखूच्या १०४ गोण्या किमत ३५ लाख रुपये व वाहन २५ लाख रुपये असा एकून ६० लाखाचा मुदेमाल जप्त करण्यात आला आहे.

परप्रातांतून महाराष्ट्रात मोठया प्रमाणात सुगंधीत तंबाखू गुटख्याचा व्यापार पोलीस प्रशासनाच्या आर्थिक मधूर संबधाने राजरोशपणे सुरू आहे. उमरखेड शहरासह ग्रामीण भागातील पानटपरी व किराणा दुकानात गुटखा सहज मिळतो मराठवाडयातील हिमायतनगर येथे सुगंधीत तंबाखू गुटख्याचे मुख्य केंद्र असून तेथून विदर्भामध्ये गुटखा पुरविल्या जात असल्याचे बोलल्या जाते. शनिवार दिनांक २७ रोजी आयचर कृमांक HR – 73 A 7844 या वाहनातून सुगंधीत तंबाखू , गुटखा हिमायतनगर जात असल्याची माहीती चातारी बिट जमादार रविंद्र चव्हाण यांना खबऱ्या मार्फत मिळताच साफळा रचून वाहनास पकडले त्यामध्ये राजनिवास नावाच्या गुटख्या सहसुंगधीत तंबाखाच्या १०४ गोण्या अंदाजे किंमत ३५ लाख रूपये व आयचर वाहन किंमत २५ लाख रुपयाचा मुदेमाल पोलिसांनी जप्त करून वाहन चालक , मालक हरियाणा राज्यातील निसार हुरनर मौला वय ४५ यास अटक केली असून पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी प्रदीप पाडवी यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार अमोल माळवे , पोल उपनिरिक्षक नारायण पांचाळ, विनित घाटोळ , जमादार रविंद्र चव्हाण, वसिम भातनासे करीत आहेत.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *