नांदेड| ज्या रेडीओला जग विसरले आहे आज पुन्हा एकदा त्या रेडीओचे आगमन भारतातच नव्हे तर जगात मोठ्या जोरदारपणे झाले आहे. रेडीओ गार्डन नावाच्या वेबसाईडवर जगातील सर्वच रेडीओ स्टेशनचे विवेचन आहे. त्यामध्ये नांदेडच्या रेडीओ 24 चा समावेश झालेला आहे. हे रेडीओ स्टेशन संगणक पदवीधर बालाजी गायकवाड हे धनेगाव येथून चालवतात. या रेडीओ स्टेशनचे दोन प्रसारण केंद्र आणखी आहेत. एक पश्चिम बंगालच्या कोलकत्ता येथे आणि एक पंजाबच्या जालंधर येथून प्रसारीत होते.
नांदेड जवळच्या धनेगाव येथे राहणारे बालाजी गायकवाड यांनी आपली पदवी संगणक विषयात प्राप्त करून खाजगी कामकाज सुरू केले. त्यामध्ये सुध्दा त्यांनी आपली प्रगती चांगलीच केली. तंत्रज्ञानाचे काम करता करता एकदा बालाजींना स्वत:चा रेडीओ स्टेशन असावा अशी कल्पना आली आणि त्यातूनच त्यांनी धनेगाव येथे आपल्या छोट्याशा घरात रेडीओ 24 चा स्टुडिओ उभारला. अत्यंत कमी कालखंडात रेडीओ 24 मध्ये दोन प्रसारण केंद्र जोडले गेले हे प्रसारण केंद्र पश्चिम बंगाल आणि पंजाब राज्यात आहेत.
या रेडीओ स्टेशनच्या माध्यमातून मनोरंजन, विनोद, कथावाचन, संगीत आदी प्रसारीत होत असते. पुढे या रेडीओ 24 च्या माध्यमातून बातम्या प्रसारीत करण्याची सुरूवात करणार असल्याचा मानस बालाजी गायकवाड यांचा आहे. या रेडीओ स्टेशनवरुन जनतेला आपल्या प्रेमळ व्यक्तींसाठी वाढदिवस शुभकामनासह इतर शुभकामना प्रसारीत करता येतील. तसेच व्यावसायीकांना आपल्या उद्योगाच्या जाहिराती सुध्दा यातून प्रसिध्द करता येतील.
Download : https://play.google.com/store/apps/details?id=radio.music.razaweb
याबद्दल सांगता बालाजी गायकवाड म्हणाले गुगल प्ले स्टोरमधून रेडीओ 24 हे ऍप डाऊनलोड करावे आणि त्यात मग ही सर्व सेवा उपलब्ध आहे. बालाजी गायकवाड यांचा मोबाईल क्रमांक 8668671716 असा आहे. नांदेडमध्ये राहणाऱ्या बालाजी गायकवाड यांनी 120 दिवसापुर्वी तयार केलेल्या या रेडीओ स्टेशनला आता जागतिक स्तरावर रेडीओ गार्डनमध्ये सुध्दा जागा मिळाली आहे. रेडीओ 24 हे पहिलेच असे रेडीओ स्टेशन आहे की, एका ऐवजी अनेक ठिकाणावरून प्रसारण करते. भविष्यात देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये रेडीओ 24 चे प्रसारण सुरू करून त्या-त्या भागातील भाषेप्रमाणे त्याचे प्रसारण करण्याचा मानस बालाजी गायकवाड यांनी सांगितला.
कधी काळी रेडीओ हेच एक प्रभावी माध्यम होते. ज्यातून जगात काय चालले आहे हे कळत होते. त्यानंतर तंत्रज्ञानामध्ये वाढ झाली. सुरूवातीला टी.व्ही. आला, त्यानंतर डिजिटल टी.व्ही. आला, त्यानंतर इंटरनेट आले, घरात-घरात संगणक आले आणि त्यामुळे या तंत्रज्ञानाच्या प्रगतीत मोठी वाढ झाली. जेवढ्या गतीने ही प्रगती वाढली त्यानुसार नवीन शोध, नवीन कल्पना सुध्दा आल्या आणि त्यातूनच एकेकाळी सर्वात आवडीचा असलेला रेडीओ आता पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर येत आहे. त्यातच नांदेड येथील एका युवकाने केलेली ही रेडीओ 24 ची सुरूवात भविष्यातील तंत्रज्ञानानुसार त्याला योग्य आणि उच्च स्तरावर नेईल अशी अपेक्षा आहे.