आरोग्य

हिमायतनगर शहरात ओमीक्रॉंनचे तीन संशयित रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेला आली जाग…..

हिमायतनगर शहरात ओमीक्रॉंनचे तीन संशयित रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेला आली जाग…..

 

 

 

ओमिक्रॉनचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावं –

डॉ.डी.डी.गायकवाड यांचे आवाहन

 

हिमायतनगर | कृष्णा राठोड

दिनांक – २३ डिसेंबर २०२१

हिमायतनगर शहरात ओमीक्रॉंनचे तीन संशयित रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. हे सर्वजण दक्षिण आफ्रिकेतुन हिमायतनगर शहरात आलेले असल्या कारणाने त्यांचेवर उपचार सुरु आहे. या तिन्ही रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत. जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत आपण ओमिक्रॉनचे रुग्ण म्हणू शकत नाही. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी प्रथमतः सर्वानी लसीकरण करून घ्यावं असे आवाहन हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयातच वैद्यकीय अधीक्षक डॉ.डी.डी.गायकवाड यांनी केले. जोपर्यंत त्यांचा अहवाल येत आहि तोपर्यंत आपण त्यास ओमिक्रॉनचा रुग्ण म्हणू शकत नाही असेही त्यांनी म्हंटले आहे.

 

हिमायतनगर शहर हे विदर्भ – तेलंगणाच्या सीमेवरील मध्यभागी असून, तालुक्याचे ठिकाण आहे, येथील बाजारपेठ मोठी असल्याने वेगवेगळ्या ठिकाणाहून येथे नागरिक, खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी येतात. देशात व राज्यातही ओमिक्रॉनचे रुग्ण आढळल्यामुळे विदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची कोविड तपासणी अनिवार्य करण्यात आली. लसीकरण झालेल्या नागरिकांना ओमिक्रॉनचा संभाव्य धोका कमी आढळल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविले आहे. पहिला डोस घेतलेल्या परंतु दुसरा डोस अपूर्ण असलेले व दुसऱ्या डोसची मुदत संपलेल्या व्यक्तींचे तातडीने लसीकरण करून ओमिक्रॉन विषाणूचा धोका टाळण्यासाठी लसीकरणाला गती देण्याच्या सूचना सरकारनं दिल्या आहेत.

 

यासाठी जिल्हाधिकारी डॉ विपीन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता हिमायतनगर तालुका संपूर्ण लसीकरण करून शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आमचे आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी ताई घरोघरी (Door To Door ) जाऊन लसीकरण मोहीम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र ग्रामीण भागात पसरलेल्या विविध अफवाला नागरिक बळी पडत असल्याने लसीकरणासाठी स्वतःहू पुढे येत नसल्याचे दिसते आहे. तसेच अनेकजण मास्क, सैनिटायजरचा उपयोग करत नाहीत, सध्या थंडीची लाट सुरु असल्याने नागरिकांनी स्वतः काळजी घेणे गरजचे आहे. त्यासाठी प्रथमतः लसीकरण करून घेणे हा एकमेव पर्याय असल्याने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लसीकरण घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे असेही त्यांनी म्हंटले.

 

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरात ओमीक्रॉंनचे तीन संशयित रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. दक्षिण आफ्रिकेतुन हिमायतनगर शहरात आलेले हे तीन जण ओमीक्रॉंन संशयित रुग्ण असल्याचे आरोग्य विभागाने सांगितल आहे. या तिन्ही रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून. सध्या या तिन्ही रुग्णांना हिमायतनगर इथून हदगांवच्या उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आल आहे. त्याचबरोबर या तीन संशयित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व नातेवाईक आणि मित्रांची आता सकाळी आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान, पुणे इथल्या आरोग्य विभागाच्या अहवालानंतरच या रुग्णांना ओमीकॉनची लागण झाली का नाही ते स्पष्ट होणार आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेत ओमीक्रॉंनचा फैलाव मोठया प्रमाणात असल्याने आरोग्य विभागाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र काही संशय वाटल्यास तपासणी करून घ्यावी आणि लसीकरण करून घ्यावे असेआवाहन केल आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *