हिमायतनगर शहरातील ज्येष्ठ शिवसैनिक विठ्ठल भाऊ ठाकरे यांनी स्वखर्चातून अपंग धोंडिबाला सायकलची भेट दिल,
शिवसैनिकांने दिली स्वखर्चातून अपंग धोंडीबाला सायकलची भेट
हिमायतनगर प्रतिनिधि -/-
शहरातील ज्येष्ठ शिवसैनिक विठ्ठल भाऊ ठाकरे यांनी शिवसेनेच्या घोषवाक्या प्रमाणे विस टक्के राजकारण व 80 टक्के समाजकारण करण्याचा विडा हाती घेतला आहे त्याचप्रमाणे शहरातील परमेश्वर गल्ली येथील अपंग व्यवसायिक धोंडीबा सूर्यवंशी यांना त्यांचा व्यवसाय करण्यासाठी सायकल देऊन दिव्यांगाची सेवा करण्यातूनच खऱ्या ईश्वरप्राप्तीची अनूभुव होतो ईश्वराला मिळवण्यासाठी जसे मंदिरात जाण्याची आवश्यकता असते तशीच समाजातील दीन, दुबळे व दिव्यांगामध्ये सुद्धा आपल्याला ईश्वराचे रुप दडलेले आहे हे पहावे लागेल असे मत हिमायतनगर येथील ज्येष्ठ शिवसैनिक विठ्ठल भाऊ ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले.
शहरातील परमेश्वर मंदिर समोर बसून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या अपंग धोंडीबा सूर्यवंशी यांना शिवसैनिक विठ्ठल ठाकरे यांनी सायकल भेट देऊन माणुसकीचा धर्म जोपासला आहे व त्या अपंग बांधवास त्याचा व्यवसाय करण्यासाठी त्याला सर्व शिवसैनिकानी प्रोत्साहन दिले व शिवसेनेच्या घोषवाक्या प्रमाणे विस टक्के राजकारण व 80 टक्के समाजकारण हे उद्दिष्ठे डोळ्यासमोर ठेऊन ते सतत समाजकार्यात अग्रेसर असतात मागील कोरोना च्या काळात त्यांनी गोर गरीब गरजू नागरिकांना अन्न धान्याच्या मोफत कीट वाटप करून सामान्य माणसांना आधार दिला होता ,वार्ड क्रं 12 मध्ये 4 ते 5 बोर मारून येथील नागरिकांचा व महिलांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटवला व अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडल्याचे पाहून त्यांनी स्वखर्चाने तेथे सिमेंट काँक्रिट करून ते बुजवले होते अशे विविध विकास कामे करणारे विकास पुरुष शिवसैनिक विठ्ठल भाऊ ठाकरे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे
यावेळी ज्येष्ठ नागरिक अक्कल वाड सर, देवकत्ते साहेब, शक्करगे सर, शिवसेना शहर अध्यक्ष प्रकाश रामदीनवार,राम नरवाडे,शिवसैनिक संतोष पूलेवार, गजानन वानखेडे सह आदी जन होते