हिमायतनगर तालुक्यात अवैध रेती उपसा कोठा, खडकी, सरसम नदी व नाले पत्रातून सुरूच
हिमायतनगर :- कृष्णा राठोड
हिमायतनगर तालुक्यात मागील काही दिवसापासून अवैद्य रेती उपसा सुरूच असून याकडे मात्र महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र सध्यातरी पहावयास मिळत आहे मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवरून जाणाऱ्या पैनगंगा नदीपात्रातून रात्री दोन ते अडीच सकाळी चारच्या सुमारास अवैध रेती उपसा व वाहतूक वाहतूक होत असून याकडे मात्र महसूल प्रशासनाचे अक्षरशा दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
भोकर -हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावर व हिमायतनगर जवळील पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मसोबा नाल्यावरून सरसम येथील काही रेती माफिया व खडकी बाजार येथील काही रेती माफिया कधी दिवसाढवळ्या तर कधी रात्री च्या सुमारास रेतीचा उपसा करून आपले उखळ पांढरे करत असल्याचे चित्र सध्यातरी पहावयास मिळत आहे परंतु या बाबीकडे सरसम मंडळाचे मंडळ अधिकारी व तलाठी महसूल चे नायब तहसीलदार यांचे अक्षरशा दुर्लक्ष असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे
महसूल प्रशासनाकडून करत असलेल्या कारवाईमध्ये नव्यानेच अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई तरुण महसूल प्रशासन शासनाची दिशाभूल करत आहे. मागील काही वर्षापासून तालुक्यातील आठ्ठल रेती माफिया वर अद्याप कुठलीही दंडात्मक कारवाई झाल्याचे अद्यापतरी सामान्य जनतेच्या नजरेस आले नसल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे वर्षानुवर्षे अवैध रेती उपसा करून सामान्य जनतेला अवाच्या सव्वा दराने रेती देऊन स्वतः गडगंज होऊन अधिकाऱ्यांनाही गड गंज चे करण्याचा काम येथील आठ्ठल रेती माफिया करत असल्याचे सामान्य नागरिकांतून बोलल्या जात आहे
तालुक्यात होणारी अवैध रेती जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर लक्ष देऊन पैनगंगा नदी पात्रा वरील रेतीघाट लिलाव करून सामान्य जनतेची होणारी लूट थांबवतील काय? त्याचबरोबर हिमायतनगर येथील महसूल प्रशासनाचे कर्मचारी स्वतःचे हित पहात असल्यामुळे मागील दोन वर्षापासून वैनगंगा नदी पात्रा वरील रेती घाटाचा लिलाव झालाच नाही त्यामुळे जिल्हाधिकारी याकडे लक्ष देतील काय ? रेती घाट लिलाव होत नसल्यामुळे शासनाच्या तिजोरी रिकामीच राहून नदी पात्रातील रेती मात्र चोरी होऊन शासनाचा महसूला करोडो रुपयाचा बुडत आहे याकडे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. बिपिन इटनकर लक्ष देतील काय असा प्रश्नचिन्ह सामान्य जनतेच्या समोर निर्माण झाला आहे.