हिमायतनगर तालुक्याचे ABS24 न्यूज चे मुख्य संपादक राजू गायकवाड यांना भरधाव येणार्या ट्रक ने दिली धडक
प्रतिनिधी / एस. के. चांद हिमायतनगर
लहुजी शक्ती सेना हिमायतनगर तालुका अध्यक्ष तथा पत्रकार आपल्या सहकारी मित्राच्या कामा निमित्त नांदेड येथे गेले असता नांदेड येथील काम आटपून हिमायतनगर कडे येतं असताना त्यांना भोकर फाटा जवळ भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रकाने जोराची धडक दिली या धडकेत राजु गायकवाड यांना उजव्या पायाला गंभीरपणे मार लागला असून त्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, परंतु त्या ठिकाणी प्लास्टिक सर्जरी होतं नसल्याने त्यांना हैद्राबाद किंवा औरंगाबाद या ठिकाणी प्लास्टिक सर्जरी करण्याचे डॉक्टरांनी सांगितले होते, त्यांची यावेळी प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खाजगी हॉस्पिटल नांदेड येथे दाखल करण्यात आले असल्याचे राजु गायकवाड यांच्या नातेवाईकांनी यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे,