अखेर हिमायतनगरातील ९४७ घरकुलाचे प्रस्ताव आ.माधवराव पाटील जवळगावकरांच्या हस्ते म्हाडाकडे मंजुरीसाठी दाख.
गृहराज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेऊन केली घरकुल धारकांचे स्वप्न साकार करण्याची मागणी
नांदेड/हिमायतनगर, एस. के. चांद | दुसऱ्या टप्प्यात नागरिकांनी दखल केलेल्या पंतप्रधान घरकुल योजनेतील शेकडो प्रस्ताव नगरपंचायत कार्यालयात धूळखात पडून असल्याचे समजल्यांनंतर आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी स्वतः लक्ष घातले. आणि घरकुल प्रस्तावाचा सविस्तर डीपीआर तयार करण्यासाठी पाठपुरावा करून अखेर दि.१४ डिसेंबर रोजी स्वतः मुंबई येथील म्हाडाच्या कार्यालयात जाऊन ९४७ घरकुलाचे प्रस्ताव मंजुरीसाठी दखल केले आहेत. या प्रस्तावास लवकरच मंजुरी मिळावी म्हणून असून, महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री जितेंद्र आव्हाड साहेबाची भेट घेऊन गोरगरिबांच्या घरकुलाचे स्वप्न साकार करण्याची मागणी केली आहे. यामुळे घरकुल धारकांचे स्वप्न लवकरच साकार होतील अशी अपेक्षा नागरिकांना आहे.
मागील अडीच वर्षात काळात नगरपंचायतीवर सत्ता भोगणाऱ्यांनी जनतेच्या प्रश्नाकडे कमी आणि स्वार्थ असलेल्या रस्ते नाल्याच्या बांधकामाकडे जास्त लक्ष दिले. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात नागरिकांनी दाखल केलेल्या घरकुलाचे शेकडो प्रस्ताव हिमायतनगर येथील नगरपंचायत कार्यालयात धूळखात पडून होते. हि बाब निदर्शनास आल्यानंतर हदगाव – हिमायतनगर तालुक्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी संबंधितांना सूचना देऊन डीपीआर तयार करणाऱ्या कुशाग्र एजन्सीला मुदतवाढ मिळवून दिला.
दुसऱ्या टप्प्यातील वंचित लाभार्थ्यांच्या घरकुलाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी वारंवार लक्ष घातले होते. त्यांनतर नवीन आणि जुने असे मिळून जवळपास ९४७ घरकुलाचे प्रस्तावाला मंजुरी मिळावी म्हणून आज दि.१४ डिसेंबर रोजी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी स्वतः म्हाडाच्या कार्यालयात जाऊन प्रस्ताव दाखल केले आहेत. तसेच महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री जितेंद्र आव्हाड साहेबाची भेट घेऊन रखडलेल्या या घरकुल प्रस्तावास लवकरात लवकर मंजुरी मिळावी. आणि वंचित घरकुल धारकांचे स्वप्न साकार व्हावे अशी मागणी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत प्रथम नगराध्यक्ष या.अखिल भाई, स्वीय्य सहाय्यक अजय सूर्यवंशी, अनिल पवार यांची उपस्थिती होती. घरकुलाचे प्रस्ताव दाखल करण्यात आल्यामुळे अडीच वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या वंचित घरकुल धारकांचे स्वप्न लवकरच साकार होतील अशी त्यांना अपेक्षा आहे.