एक हात मदतीचा वैशाली ठाकरे यांना आर्थिक मदत महागांव तालुक्यातील खडका येथून
जिल्हा प्रतिनिधी/एस.के.शब्बीर महागांव
करंजखेड येथील रणरागिनी ला आर्थिक मदत एक हात मदतीचा म्हणून खडका येथून देशमुख ट्रेडिंग कंपनीचे मालक श्री प्रकाशराव रावसाहेब देशमुख.यांनी वैशाली ठाकरे.यांना आर्थिक मदत दिली.
महागाव तालुक्यात गेल्या काही दिवसा अगोदर वैशाली नीळकंठ ठाकरे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला होता. त्या बिबट्याच्या जबड्यातून स्वताची सुटका करणारी कुमारी वैशाली ठाकरे यांच्या घरी भेट देऊन तब्येतीचे हाल व विचारपूस करून प्रकाशराव देशमुख यांनी वैशाली ठाकरे यांचे खूप कौतुक केले व आर्थिक मदत सुद्धा देण्यात आली
आपले स्वतःचे जीवाची लढा लढणारी रणरागिनी ला शुभेच्छा सुद्धा दिल्या.
या वेळी खडका येथून डॉ. संदीप शिंदे. तुषार देशमुख. शालीकराव मंठाळकर व अग्रवाल खडका येथून करंजखेड येथे वैशाली ठाकरे यांच्या राहत्या घरी जाऊन भेट दिली …….