नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे
हिमायतनगर तालुक्या सह संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद सदस्यांच्या वाट्याला येणारा लाखो रुपये फंड निधी जो दलित वस्त्यांच्या विविध विकास कामाकरिता खर्च करून त्या वस्त्यांमधील दलितांच्या आडी अडचणी सोडविण्या करिता आलेला निधी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला ग्रामसेवकाला आणि दलित वस्त्यांमधील राहणाऱ्या नागरिकांना विचारूनच त्यांच्या अडीअडचणी विचारूनच जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी काम करणे गरजेचे आहे
परंतु असे न होता जिल्हा परिषदेच्या दलित वस्तीमध्ये आवश्यक कोणती कामे आहेत खरोखरच त्यांना त्या कामाची गरज आहे का या बाबीचा विचार करून निधी टाकला जावा व योग्य प्रकारची आवश्यक कामे करणे गरजेचे आहे परंतु जिल्हा परिषद सदस्य तसे पण करताना दिसत नाहीत फक्त मला कोण किती टक्के देतो याकडे लक्ष ठेवून त्या गावात निधी टाकला जातो या पाच वर्षांच्या काळात बहुतेक जिल्हा परिषद सदस्यांनी गावात व दलित वस्ती मध्ये लाईटच्या कामाला प्राधान्य दिलेले दिसते दोन दिवसात पोल कसेबसे उभारून लाईट फिट करून लगेच उजेड केला गेला निकृष्ट दर्जाचे लाईट फोकस वायर वापरत लाखो रुपयांची अंदाजपत्रक दाखवून शासनाची फसवणूक केली आणि स्वतःचे खिसे गरम केले या पाच वर्षांत बसलेल्या 80% लाईट दोन ते तीन महिन्यातच बंद पडले बऱ्याच ग्रामपंचायतीच्या स्वाधीन केलेले काम हस्तांतरित केले नाही ना ग्रामसेवक ना सरपंचांना विचारले सुद्धा नाही दलित वस्तीच्या निधीतून मागासवर्गीयांच्या मागणीनुसार काम कुठे टाकावीत जिल्हा परिषद सदस्य इलेक्शनचा खर्च काढण्यासाठी हायमास्ट लाईट बसून लाखो रुपये कमावतात आता तर जिल्हा परिषद सदस्यांना नवीन फंड दलित वस्तीत पण टाकायचा असेल तर 15 ते 20 टक्के कमिशन जिल्हा परिषद सदस्य घेतात त्यामुळे काम निकृष्ट दर्जाचे कंत्राटदार करीत आहेत अशी तालुक्यात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे