राजकारण

केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल-गँसची दरवाढ करून सर्वसामान्य नागरीकांची केली राख ,

केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल-गँसची दरवाढ करून सर्वसामान्य नागरीकांची केली राख

 

सोयामील पेंड आयात करून केंद्र सरकारने सोयाबीन शेतमालाचे भाव पाडण्यात महत्वाची भुमीका बजावली सुनिल पतंगे यांचे वक्तव्य

 

 

नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे

 

देशात मोदी सरकार मोठा गाजावाजा करत २०१४ साली केंद्रामध्ये सतेत आलं. जनतेला आश्वासनाची खैरातच वाटली होती. त्यावेळी जनतेलाही वाटले सत्ता बदल झाल्यावर आपले चांगले दिवस येतील परंतु जनतेनी जी स्वप्न मोदी सरकारकडून बघीतली होती. ती प्रत्यक्षात खोटी ठरल्याचे आजची परस्थिती बघीतली तर लक्षात येते.

मोदी सरकारने केंद्रामध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर असे काही निर्णय घेतले त्या निर्णयामध्ये जनतेच्या स्वप्नांची राख झाली आणि मोदी सरकारने एका मागे एक असे निर्णय घेऊन देशात प्रत्येक वस्तूच्या, इंधनाच्या किंमती वाढवायला सुरूवात केली. त्यामुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे.

आज घडीला देशामध्ये पेट्रोल, डिझेल, घरगुती गँसचे दर गगनाला भीडले आहे. मागील तीन-चार महीन्यात इंधनाचे दर दुप्पटीने वाढले आहेत. इंधन दरवाढीमुळे प्रवाशी वाहन चालकांनी प्रवासी भाडे वाढवल्याने सर्वसामान्य जनतेला प्रवास करणे अवघड बनले आहे. त्याचबरोबर उज्वला गँस योजने अंतर्गत गरीबांना गँसचे मोफत कनेक्शन दिले आणि आता गँसचे दर वाढवून पैसे उकळण्याचे काम केद्र सरकार करत आहे.

इंधन दरवाढीबरोबर केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर सोयामील पेंड आयात करून सोयाबीन शेतमालाचे भाव पाडण्यात महत्वाची भुमीका साकारली. केंद्र सरकारने केवळ पोल्ट्री फाँर्मवाल्यांच्या हिताचा निर्णय घेऊन जागाचा पोशिंदा बळीराजाला मरनाच्या खाईत लोटले. यावर्षी आदी पावसाने पिके नष्ट केली. आणि पाऊस, पुरातून वाचलेल्या सोयाबीन शेतमालाचे भाव पाडल्याने सावकाराचे कर्ज कसे फेडायचे या समस्येने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने आज पर्यंत उभा राहत आलेला आहे. शेतकऱ्यांची वाईट परीस्थिती लक्षात घेऊन आज दि. ९ डिसेंबर रोजी हिमायतनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करून पेट्रोल-डिझेल, गँस दरवाढी बद्दल केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल, गँसचे दर कमी करून सोयाबीन शेतमालाल योग्य भाव द्यावा अशी मागणी राष्टवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल पतंगे, शहराध्यक्ष उदय देशपांडे, युवक जिल्हा उपाध्यक्ष सरदारखान पठाण, नगरसेवक प्रभाकर अण्णा मुधोळकर, कनिराम जाधव, सरपंच मारोती वाडेकर, आकाश सुर्यवंशी, गणेश रच्चेवार, आशितोष बोरेवाड, मुबीन कुरेशी, दाऊ गाडगेवाड, सुमेध भरणे, विठ्ठल पिनलवाड, विश्वनाथ देवसरकर, धोंडबा वानखेडे, विलास वानखेडे, नामदेव वानखेडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते या रस्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *