क्राईम डायरी

हिमायतनगर तालुक्यात दहशत: चोरट्यांनी एकाच रात्री एकंब्यातील दोन घरे फोडली.

हिमायतनगर तालुक्यात दहशत: चोरट्यांनी एकाच रात्री एकंब्यातील दोन घरे फोडली.

नांदेड हिमायतनगर प्रतिनिधी/  नागोरावं शिंदे

तालुक्यातील मौजे एकंबा येथील ऑटो ड्रायवर सुनील सगणंवाड व आनंदराव दिगामबर घुगराळे यांच्या घरातील सोन्या चांदीचे दागिने व नगदी रोख रक्कम व पैसे घेऊन घरातील पेटी शेतात नेऊन फेकल्याची घटना दि.४ डिसेंबर च्या मध्य रात्री १ते २ च्या सुमारास घडली त्यामुळे आता ग्रामीण भागात सुद्धा भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.

 

तालुक्यासह शहरात चोरट्यांनी खुप मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे .

 

ह्या चोरीच्या घटना थाबण्याचे नावच घेत नाहीत. ह्या बाबी ला स्थानिक पोलीस सुद्धा परेशान झाले आहेत . जागो- जागी अनेक नव तरुण मंडळी ह्या चोरांच्या भीतीने संपूर्ण रात्र जागून काढत आहेत तरी पण ह्या सर्व बाबी ला चकमा देत चोरट्यांनी त्यांच्या चोऱ्या काही थांबल्या नाहीत दररोज मध्य रात्री चोरांच्या अनेक टोळ्या शहरात दाखल होत आहेत अशी माहिती गावकऱ्यांनी दिली पण ती कितपत खरी आहे . ह्याची शहा निशा स्थानिक पोलीस प्रशासन का करत नाही ? असा पण आरोपी गावकऱ्यांनी केला आहे . ह्याच पार्श्वभूमी वर दीं.४ डिसेंबर च्या मध्या रात्री हिमायतनगर शहरात ठीक ठिकाणी चोराच्या भीतीने अनेक नव तरुण युवकानी आप आपल्या गल्लीत रात्रीची ग्रस वाढवल्या मुळे त्या चोरट्यांनी आता त्यांचा मोर्चा आता ग्रामीण भागा कडे वळवल्याचे काल घडलेल्या घटनेवरून उघड झाले आहे . तालुक्यातील मौजे एकंबा येथील ऑटो ड्रायवर सुनील सगणंवाड व आनंदराव दिगामबर घुगराळे यांच्या घरातील सोन्या चांदीचे दागिने व नगदी रोख रक्कम व पैसे घेऊन घरातील पेटी शेतात नेऊन फेकल्याची घटना दि.४डिसेंबर च्या मध्यरात्री घडली ह्याची माहिती गावकऱ्यांना लागताच त्या ठिकाणी असलेल्या चोरांनी तेथून पळ काढला त्यामुळे आता संपूर्ण तालुक्यात ह्या चोरांची भीती निर्माण झाली आहे.

 

” अगोदरच कोरोना महामारी मुळे अनेक दिवस गोर गरीब नागरीकांना रोजगार उपलब्ध नव्हता आणि आता कुठे चागले दिवस आले तर अशा चोरट्यानी शहरात धुमाळून घातल्याने गोर गरीब नागरिकांन मध्ये खूप मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ह्या वर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ उपाय योजना करून शहरात रात्रीचा पोलीस बंदोबस्त वाढून द्यावा अशी मागणी समस्त गावकरी वर्गातून होत आहे ”

 

[संशयित नागरिक दिसल्यास पोलिसांना संपर्क करा पोलीस निरीक्षक कांबळे]

 

हिमायतनगर शहरा सह तालुक्यात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटना घडत आहेत या सर्व बाबीवर हिमायतनगर पोलिस प्रशासन करडी नजर ठेवून आहे . जिथे कुठे आपणास संशयित नागरिक दिवसा-रात्री ला फिरत असल्याचे आढळून आल्यास ह्याची माहिती गावकऱ्यांनी हिमायतनगर पोलिस प्रशासनास द्यावी असे आवाहन हिमायतनगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांनी केले आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *