जेष्ठ नाट्यकलावंत श्री मुरारी नरसिंगा चेपुरवार यांचे वयाच्या 85 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन.
हदगाव /हिमायतनगर….प्रतिनिधी
जेष्ठ नाट्यकलावंत श्री मुरारी नरसिंगा चेपुरवार यांचे वयाच्या 85 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले
त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी 2 वाजता मूळ गाव वाळकी येथे अंत्यसंस्कार केलं जाणार आहे. त्यांच्या निधनाने एक हुरहुन्नरी कलावंत काळाच्या पडद्याआड गेल्यानं वाळकी गावाचं मोठं नुकसान झालं आहे.
त्यांना लहानपणी पासून नाटकांची आवड होती लोककलावंत म्हणनु काम करताना त्यांनी हदगाव हिमायतनगर तालुक्यात शेकडो नाटक सादर करून गाजवून सोडले होते. त्यांच्या गाजलेल्या नाटकातून ते संपुर्ण महाराष्ट्रात ओळखले जात होते. त्यांनी विविध विषायवर नाट्य लिखीत करुन सादर केले होते. नाटकात त्यांनी विविधांगी भुमिका साकारून एक ग्रामीण कालावन्त म्हणुन ख्याती मिळविली. त्यांचं कलेची दाद देत मोठं मोठया लग्न कार्यात देखील त्यांना आमंत्रित केलं जायचं, चेपूरवार वाळकीकर येणार म्हंटल की अनेकांना उत्सुकता असायची, इसाई देवीची वाळकी येथील रहिवासी असल्याने मुरारी चेपुरवार यांनी गावावरत गित लिखान केले.
नांदेड जिल्हातील हदगाव तालुक्यात येणाऱ्या इसाई देवीची कृपा सगळ्यावर…. वाळकी लई गुलजार….
इसाई देवीची कृपा सगळ्यावर…. असे गित त्यांनी लिखान करुन वाळकी बाजार गावाचे नावलौकिक केलं त्यांच्या वृद्धापकाळाने झालेल्या निधनामुळे गावचा हुरहुन्नरी कालावन्त काळाच्या पाडद्याआड गेल्याने मोठे नुकसान झाले आहे, त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी 2 वाजता वाळकी येथे अंत्यसंस्कार केलं जाणार आहे.