महावितरण कंपनी च्या गलथान कारभारामुळे रुब्बी चे पिक ही वाया जाते की काय
हिमायतनगर |कृष्णा राठोड
महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक अतिवृष्टी चे दृश्य पाहायला मिळाले या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात खरीप हंगाम वाया गेलेला दिसून आला. व आयनवेळी पावसाने हजेरी लावल्याने रब्बीची पेरणी पहिलेच उशिरा होत आहे. अतिपावसामुळे यावर्षी पहिलेच तर शेतकऱ्याचे पावसामुळे खरीप हंगाम वाया गेले आता महावितरण कंपनी च्या गलथान कारभारामुळे रुब्बी चे पिक ही वाया जाते की काय अशी शेतकऱ्यांची चिंता वाढली जे शेतकरी लाईट बिल भरले त्याचे सुद्धा वीजपुरवठा खंडित केलेला सुरळीत चालू केले नाही आहे. ज्या शेतकऱ्याने लाईट बील भरले त्याचा विद्युत पुरवठा सुरळीतपणे चालू करून द्यावी अन्यता लोकशाही मार्गाचा अवलंब करावा लागेल असा इशारा बालाजी बलपेलवाड यांनी दिला महावितरण कंपनी ना थेट. हिमायतनगर महावितरण चे डीवाइ लोणी साहेब यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधल्यास शासनाचे आदेश आहेत. कृषी पंपाचे वीज खंडित करणे व शासनाकडून कुठल्याही पद्धतीचा अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्यांची वीज खंडित करू नका असा आदेश आलेला नाही. त्यांनी स्पष्ट सांगितले हिमायतनगर तालुक्यातील लोकप्रतिनिधी व विविध पक्षातील नेते मंडळी आपापल्या क्षेत्रांमध्ये येणार्या निवडणुकीची मोर्चेबांधणी करीत आहे. परंतु शेतकऱ्यांचे आज खऱ्या अर्थाने उभा पीक शेतामध्ये वाळत आहे. यांच्याकडे कोणीही लक्ष देताना दिसत नाही. शेतकरी वर्गाकडून असे म्हटले जात आहे. शेतकरी काय फक्त मतदानासाठी च आहे. का आज शेतकरी संकटांमध्ये आहे. शेतकऱ्यांवर मोठा डोंगर कोसळला सारखं शेतकऱ्यांना वाटतो असे शेतकऱ्यांची प्रतिक्रिया येत आहे. शेतकर्यांनी गहू हरभरा रब्बी पिकाचे पेरणी ही केली विद्युत कनेक्शन नसल्याकारणाने उभा पिक वाळत आहे. व पेरणी केलेला बियाणे व खत जमिनी मध्येच कुजून जाताना दिसत आहे. महावितरण कंपनी व शासनाने जाग न घेतल्यास लोकशाही पद्धतीने बालाजी बलपेलवाड आंदोलन करणार सर्व शेतकऱ्यां च्या समर्थ ना मध्ये अशी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.