राजकारण

हिमायतनगर मुस्लिम आरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक दिवसीय

हिमायतनगर मुस्लिम आरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक दिवसी

 

हिमायतनगर | कृष्णा राठोड

पैगंबर महम्मद बिल आणि मुस्लिम आरक्षणासाठी 22 नोव्हेंबर रोजी हिमायतनगर तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले

 

मुस्लिम समाजाच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी सातत्याने आवाज उठवत आहे 5 जुलै 2019 रोजी विधान भवनावर मोर्चा काढून न्यायालयीन मान्यता दिलेल्या फास्ट के मुस्लिम शैक्षणिक आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी यासाठी हे एक दिवशी आंदोलन करण्यात आले होते धरणे आंदोलनात एकूण सहा प्रमुख मागण्या होत्या

 

 

ज्ञान आणि मान्यता दिलेल्या मुस्लिम पाच टक्के आरक्षण तात्काळ लागू करण्यात यावी, धार्मिक भावना भडकून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या कठोर शिक्षा देणारे पैगंबर महम्मद बिल वंचित बहुजन गाडीने शासनाला सुपूर्द केले आहे ते बिल येणाऱ्या अधिवेशनात मंजूर करून तात्काळ कायदा करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने करण्यात आली, महाराष्ट्र वफ बोर्डाच्या मिळकतीमध्ये वाढ करून इमाम मोअज्जीनखुदाम हजरत यांना मासिक ते तर सुरु करावे, संत विचारांची प्रचार व प्रसार करणाऱ्या ह. भ. प. किर्तनकार यांना शासनाकडून मासिक वेतन चालू करावे, वफ बोर्डाच्या जमिनीवर झालेल्या अवैध कब्जा करून त्या जागेचा अल्पसंख्यांक समाजाच्या उन्नतीसाठी उपयोग करावा, सार्थी,बार्टी,महाज्योती प्रमाणे मुस्लिम अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्थेची स्थापना करावी

 

 

आदी मागण्यांसह वंचित बहुजन आघाडी शाखा हिमायतनगर च्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन हिमायतनगर तहसील कार्यालयासमोर करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष डॉक्टर रविराज दूधकावडे, वंचित बहुजन आघाडीचे नेते गोविंद गोखले, वंचित बहुजन आघाडी हिमायतनगर महासचिव गंगाधर गोखले, युवा तालुका अध्यक्ष राजू वाठोरे, युवा तालुका उपाध्यक्ष शरद हनवते, सर्कल अध्यक्ष गौतम सावते, तालुका उपाध्यक्ष संभाजी राऊत, माजी शहराध्यक्ष विशाल हनवते, आदीसह गंगाधर गायकवाड, योगेश लव्हाळे, शेषराव सोनकांबळे. कार्यकर्त्यांनी एक दिवसीय धरणे आंदोलन आपला सहभाग नोंदविला

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *