वंचित आघाडीच्या वतीने पैगंबर मोहम्मद बिल मुस्लिम आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी चे निवेद
? जिल्हा प्रतिनिधी एस.के.शब्बीर महागांव
महागांव. येथे. मुस्लिम समाजाच्या न्याय्य हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी सातत्याने आवाज उठविला आहे दि..5/ जुलै.2021 रोजी विधान भवनावर मोर्चा काढून न्यायालयाने मान्यता दिलेल्या 5 % मुस्लिम शिक्षणिक आरक्षणाची अंमलबजावणी करावी आणि वंचित बहुजन आघाडी ने दिलेले पैगंबर मोहम्मद बिल पास करावे व इतर मागण्याचे निवेदन मा. मुख्यमंत्र्या पर्यंत पोहोचविण्यात आले होते त्याचाच पुढचा टप्पा मुस्लिम समाजाच्या संवैधनिक . हक्क विकारासाठी आज रोजी तहसील कार्यालय महागाव येथे वंचित बहुजन आघाडी च्या वतीने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
न्यायालयाने मान्यता दिलेल्या 5% मुस्लीम शिक्षणिक आरक्षण तात्काळ लागू करण्यात यावे धार्मिक भावना भडकावून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या कठोर शिक्षा देणारे सदर बिल अधिवेशनात मंजूर करून तात्काळ तो कायदा लागू करावा महाराष्ट्र वक्फ. बोर्डाच्या एकाची मध्ये वाढ करून विमाम. व मुअज्जीम आणि खुदाम हजरात यांना मासिक वेतन सुरू करण्यात यावे
वक्फ
व बोर्डाच्या जमिनीवर झालेले अवैध कब्जा हटवून त्या जागेचा अल्पसंख्याक समाजात उन्नतीसाठी उपयोग करावा सारथी बार्टी महादेवाची प्रमाणे मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यासाठी. स्वतंत्र परीक्षण संस्थेची स्थापना करावी इत्यादी मागणी चे वंचित बहुजन आघाडी तालुका महागाव च्या वतीने निवेदन देण्यात आले
यावेळी (विजय लहाने. माजी जिल्हाध्यक्ष ) वंदना भवरे. विजयकुमार कांबळे. रामराव कांबळे. गौतम पडघणे. हिरामण ढगे. सुखदेव बेसाजी कोल्हे. (पप्पू कावळे शहराध्यक्ष). गणेश हनवते. सय्यद अहमद. सय्यद नजीर. अकबर खा आजाद खा पठाण. शेख साजन. शेख हरून. शेख बबलू. शेक हमजा. समाधान दवणे. गौरव आळणे. सुधीर वाठोरे. अमोल लहाने. व इतर बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते…