हिमायतनगर तालुक्यातील अनेक ग्रामीण भागांमध्ये सध्या या वातावरणामुळे चिकनगुनिया या आजाराचे बरेच रुग्ण आढळत आहेत.या रुग्णांना आधी ताप येऊनया टायफाईड, चिकनगुनिया आजार मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे.
या आजाराचे बोरगडी तांडा येथील घराघरात चिकनगुनिया रुग्ण आढळत आहे.घरातील एक-एक दोन-दोन रुग्ण या आजाराने त्रस्त आहेत.एकीकडे शेतकऱ्यांचे रब्बी हंगाम असून शेतकरी ऐन कामाच्या वेळेसच चिकनगुनिया आजारांनी ग्रस्त दिसत आहे.
या बोरगडी गावामध्ये चिकनगुनिया या आजाराने थैमान घातले आहे.चिकनगुनिया आजाराचे रुग्ण पूर्ण अंग दुखी मुळे त्रस्त आहेत.तरी या याकडे आरोग्य विभागाने लक्ष दिले पाहिजे, व या रोगावरील उपचार करून सहकार्य करावे असे गावातील नागरिकांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
हिमायतनगर /….कृष्णा राठोड