ताज्या घडामोडी

महागांव तालुक्यात कार्तिक दिंडीला खडका या गावात सूर्यदियापूर्वी काकड आरती भक्त या दिंडीला सुरुवात केली,

 

प्रतिनिधी / एस. के. शब्बीर यांची रिपोट

महागाव तालुक्यातील खडका गावात कार्तिक महिन्यात सूर्योदयापूर्वी निघणाऱ्या दिंडीने भक्तीमय वातावरण झाले. कार्तिक महिना आला की पहाटेच्या थंडीत भक्तीगीतांचे मंजूर स्वर कानी पडतात त्याला साथ असते टाळ मृदुंगाची. वारकरी भजनी मंडळी अभंग, भजन, भक्तीगीते गवळण, भारुड, मंजुळ स्वरात गातात.गल्ली बोळातून फिरून प्रत्येक तुळशी वृंदावनाला जलाभिषेक करून पूजा करतात. महिला मंडळी सडा टाकून रांगोळी काढून आरतीचे ताट घेऊन भजनी मंडळी चे स्वागत करतात. गावातील अनेक घरी दिंडीतील भाविकासाठी चहा फराळ पाण्याची व्यवस्था करण्यात येते सोमवारी सायंकाळी दिंडी काढतात एकादशीला बैठ्या भजनाचे आयोजन करतात.

या दिंडीची समाप्ती विशेष सोहळ्याने होते गावाजवळील आवळ्याच्या झाडाचे पूजन होते दिंडीची समाप्ती महाप्रसादाने होते. तर दुसर्या् दिवशी दहीहंडी काला केल्या जातो.

गावातील हनुमान मंदिर, महादेव मंदिर, गणपती मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे काकड आरती होते.

दिंडीतील भजने मंडळींना दररोज सकाळी चहाची व्यवस्था शंकरराव देशमुख यांनी केली. सर्व भजनी मंडळीचे दत्तदराव कदम यांनी पाय धुन टॉवेल टोपी देऊन स्वागत केले.

या दिंडी सोहळ्यात दशरथ कदम, गोविंदराव शिंदे, नंदकिशोर राऊत, चंद्रशेखर देशमुख, सुदामराव बोखारे, माधवराव देशमुख, राजेंद्र ठाकरे, रवींद्र राऊत, वसंत गोस्वामी, माटाळकर मामा, राजूभाऊ भामकर, जगदीश भामकर, विष्णू वानखेडे, आनंदराव देशमुख, डॉ.संदीप शिंदे, विनोद घोरपडे, शरद देशमुख, रमेशराव देशमुख, बाबाराव शिंदे,गजानन ठाकरे, सचिन पुरोहित, राजू गायकवाड, अवधूत शिंदे, बाबुराव कदम, तसेच विशाल, श्रीकांत, शैलेश, कुणाल, युवराज, कृष्णा, हरी, सोहम, प्रतीक, हर्ष ,शिवराज, आशिष, अभिषेक ,सत्यम, अथर्व ,ईश्वरी, वैष्णवी, ममता, समृद्धी,नेतल, स्वेता, नव्या, आरुषी, आराध्या ही बाळगोपाळ मंडळी उपस्थित असतात.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *